धोकादायक पुलाच्या दुरुस्तीसाठी १३ कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:43 AM2021-02-28T04:43:23+5:302021-02-28T04:43:23+5:30

तालुक्यातील खामगाव ते यळंब रस्त्यावरील नीलकंठा नदीवर नवीन पूल बांधण्यासाठी २ कोटी ५० लाख, वैराग ते धामणगाव रस्त्यावरील नागझरी ...

13 crore sanctioned for repair of dangerous bridge | धोकादायक पुलाच्या दुरुस्तीसाठी १३ कोटींचा निधी मंजूर

धोकादायक पुलाच्या दुरुस्तीसाठी १३ कोटींचा निधी मंजूर

Next

तालुक्यातील खामगाव ते यळंब रस्त्यावरील नीलकंठा नदीवर नवीन पूल बांधण्यासाठी २ कोटी ५० लाख, वैराग ते धामणगाव रस्त्यावरील नागझरी नदीवर नवीन पूल बांधण्यासाठी ३ कोटी ८० लाख, घाणेगाव ते साकत रस्त्यावरील नीलकंठा नदीवर नवीन पूल बांधण्यासाठी २ कोटी ५० लाख, घाणेगाव ते साकत रस्त्यावरील भोगावती नदीवर नवीन पूल बांधण्यासाठी २ कोटी ५० लाख, कापसी ते सावरगाव या रस्त्यावरील खडकी नाला येथे नवीन पूल बांधण्यासाठी २ कोटी १० लाख रुपये याप्रमाणे निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला. शासनाच्या ग्रामविकास विभागातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या ए. डी. बी. टप्पा २ अंतर्गत तालुक्यातील वरील कामांना प्रशासकीय मान्यता मिळून १३ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

Web Title: 13 crore sanctioned for repair of dangerous bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.