वीसपेक्षा कमी बेड असणाऱ्या १३ रुग्णालयांना कोविड उपचार करण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 12:18 PM2021-05-10T12:18:40+5:302021-05-10T12:18:44+5:30

महापालिका ः ऑक्सिजनबाबात स्वयंपुर्ण झाल्यास पुन्हा मान्यता देणार

13 hospitals with less than 20 beds are banned from treating covid | वीसपेक्षा कमी बेड असणाऱ्या १३ रुग्णालयांना कोविड उपचार करण्यास मनाई

वीसपेक्षा कमी बेड असणाऱ्या १३ रुग्णालयांना कोविड उपचार करण्यास मनाई

Next

सोलापूर : शहरात पूर्ण रुग्णांवर उपचार करणाऱ्या असणाऱ्या वीस पेक्षा कमी असणाऱ्या रुग्णालयांना उपचार करण्यास मनाई करण्यात आली आहे. छोट्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करणे अवघड होत आहे. तसेच नागरिकांसाठी महापालिका स्वतः शंभर ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळित होत नसल्यामुळे रुग्ण व नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण होते. रुग्ण अत्यवस्थ झाल्यास त्यांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जावे लागत होते. यातच बेड न मिळाल्यास अधिक अडचण होत होती. सोलापुरात चार ऑक्सिजन प्लांट असून ते सर्वांनात ऑक्सिजन पुरुवू शकत नाहीत. त्यामुळे कमी बेड असणारे शहरातील १३ हॉस्पीटलची कोविड सेवा पुरविण्याची मान्यता महापालिकेतर्फे रद्द करण्यात आली आहे.


रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळित झाल्यानंतर परवानगी देण्यात येईल. यासाठी रुग्णालयांनी स्वताचे ऑक्सिजन प्लांट उभे करुन सुरळित ऑक्सिजन पुरवठा केल्यास त्यांना पुन्हा मान्यता देण्यात येणार असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. त्याऐवजी महापालिकेचे काडादी मंगल कार्यालयात १०० बेड ऑक्सिजन सुरु करण्यात येत असून सध्या ४० बेड सुरु करण्यात येत आहे. नागरिकांनी या नव्या हॉस्पीटलमध्ये उपचार घ्यावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

खासगी रुग्णालयात नाराजी
ऑक्सिजनसाठी आम्ही महापालिकेवर अवलंबून नसून स्वतःच व्यवस्था केली आहे. आम्ही रुग्णांना चांगली सेवा देत असताना महापालिकेने हा निर्णय घेतला असल्याची खंत रुग्णालयांनी व्यक्त केली. यापुढे कोविड रुग्णावर उपचार करू नका असे कोविड कंट्रोल रूमकडून सांगण्यात आले. याविषयी कोणतेही पत्र महापालिकेकडून देण्यात आले नसल्याचे रुग्णालयांकडून सांगण्यात आले.


सध्या ऑक्सीजनचा तुटवडा आहे. ऑक्सीजनचा पुरवठा शाश्वत होत नाही तोपर्यंत छोट्या रुग्णालयांना ऑक्सीजन पुरवठा करणे कठीण आहे. महापालिकेने काडादी मंगल कार्यालयात १०० ऑक्सीजन बेड उपलब्ध करुन दिले आहेत. छोटी रुग्णालये स्वत:हून ऑक्सीजन मिळविण्यास तयार असतील तर त्यांना भविष्यात कोवीड केअर सेंटरची परवानगी मिळू शकते.
    - धनराज पांडे, उपायुक्त, मनपा.

Web Title: 13 hospitals with less than 20 beds are banned from treating covid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.