श्रीपूरमध्ये १३ जणांवर अॅट्रासिटी चुकीचा गुन्हा
By admin | Published: May 30, 2014 12:47 AM2014-05-30T00:47:32+5:302014-05-30T00:47:32+5:30
माघार घेण्याच्या मागणीसाठी श्रीपूर बंद
श्रीपूर : श्रीपूर येथे बुधवारी झालेल्या किरकोळ वादावरून १३ जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला म्हणून श्रीपूर व बोरगाव परिसरामधील सर्व नागरिकांनी अकलूज पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यामध्ये अकलूज पोलीस ठाण्याचे पो.नि. विश्वास साळुंखे यांनी मोर्चेधारकांची तक्रार न घेता उलट दमबाजीची भाषा करत मोर्चेधारकांना दबंगगिरी करण्यात आली. श्रीपूरमध्ये बुधवारी २८ मे रोजी दुपारी गणेश वजाळे व संभाजी चव्हाण यांचा मोटरसायकल व टेम्पोची धडक झाल्याने किरकोळ बाचाबाची झाली. त्याचे मोठ्या मारहाणीत रूपांतर झाले. त्यावरून श्रीधर वजाळे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली असता त्यामध्ये आझाद शेख, कबीर शेख, हफीज शेख, समीर शेख, कबाब शेख, दावल शेख, बाबासाहेब होनमाने, नरेंद्र स्वामी जंगम, सुनील कदम, चांगदेव साळुंखे, सद्दाम शेख, संभाजी चव्हाण, शिवाजी भोसले (सर्व रा. बोरगाव) यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केला असून पोलीस कोठडी मिळाली आहे. याच्याविरोधात सायंकाळी येथील सर्वपक्षीय, व्यापारी, सर्वसामान्य जनतेने अकलूज पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यामध्ये ३०० ते ४०० नागरिक सहभागी झाले होते. यामध्ये सायंकाळी श्रीपूर बंद पाळण्यात आला. अॅट्रॉसिटी मागे घ्यावी म्हणून सर्व मोर्चेधारकांची मागणी केली व खोटी तक्रार देणार्यास त्वरित अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. वजाळे यांच्याविरूद्ध शिवाजी भोसले (रा. बोरगाव) यांनी पोलीस ठाण्याला गणेश वजाळे, भीमराव वजाळे, विशाल जगधने, सुजीत वजाळे, गुट्टू वजाळे, विश्वजित भालशंकर इतर आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या मोर्चात व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र सावंत-पाटील, उपसरपंच अनिल जाधव, रतनसिंह रजपूत, नंदकुमार मांडवे, बाळासाहेब पिसाळ, अरूण तोडकर, संतोष गार्डीकर आदी सहभागी झाले होते.
-----------------------------
बाजू मांडायची असेल तर कायद्याचे ज्ञान घ्या, नंतर पोलीस ठाण्याला या, जमावामध्ये कुणालाही बोलता येते, दम असेल तर एकटा येऊन लेखी तक्रार करा, अशी अरेरावीची भाषा करून मोर्चेधारकांना बाजूच मांडू दिली नाही. - विश्वास साळुंखे पोलीस निरीक्षक, अकलूज पोलीस ठाणे
-------------------------------
कायदा सर्वांसाठी आहे. अॅट्रॉसिटीबद्दल घाबरू नये. लोकांनी लेखी तक्रार द्यावी, मग तपास करून अशा लोकांना हद्दपार, मोक्का असे गुन्हे दाखल करू. - संजयकुमार पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी