३२ पोलीस ठाण्यांतर्गत १३०० व्यक्ती बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:21 AM2020-12-29T04:21:49+5:302020-12-29T04:21:49+5:30

सोलापूर शहरात ७ तर तालुकानिहाय २५ अशी जिल्ह्याभर ३२ पोलीस स्टेशन कार्यरत आहेत. १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट ...

1300 persons missing under 32 police stations | ३२ पोलीस ठाण्यांतर्गत १३०० व्यक्ती बेपत्ता

३२ पोलीस ठाण्यांतर्गत १३०० व्यक्ती बेपत्ता

Next

सोलापूर शहरात ७ तर तालुकानिहाय २५ अशी जिल्ह्याभर ३२ पोलीस स्टेशन कार्यरत आहेत. १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट या कालावधीत सोलापूर शहरातील १८२ पुरुष व १६९ महिला असे ३५१ तर जिल्ह्यातील २५ तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील ३६१ पुरुष व ५८८ महिला असे ९४९ जण बेपत्ता असल्याच्या तक्रारी दाखल आहेत. महिला आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होणे ही बाब अतिशय गंभीर मानली जात आहे. सोलापूर शहरात पुरुष तर ग्रामीणमध्ये बेपत्ता महिलांची संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी घरी परतणाऱ्यांचे प्रमाण ८० टक्के असून, उर्वरित २० टक्के लोक जातात कुठे, हा संशोधनाचा विषय आहे.

बेपत्ता व्यक्तींची सरासरी आकडेवारी

सोलापूर शहर : जानेवारी (१० महिला, १९ पुरुष), फेब्रुवारी (१५ महिला, १८ पुरुष), मार्च (२४ महिला, १८ पुरुष), एप्रिल (३ महिला, १ पुरुष), मे (४ महिला, ५ पुरुष), जून (५ महिला, १० पुरुष), जुलै (८ महिला, १७ पुरुष), ऑगस्ट (२४ महिला, २० पुरुष), सप्टेंबर (१० महिला, २० पुरुष), ऑक्टोबर (१७ महिला, २१ पुरूष), नोव्हेंबर (२२ महिला, १५ पुरुष), डिसेंबर (२७ महिला, १८ पुरुष) अशा ३५१ व्यक्ती बेपत्ता झाल्या आहेत. तालुका पोलीस स्टेशन हद्द : जानेवारी (५३ महिला, ४० पुरुष), फेब्रुवारी (५१ महिला, ३५ पुरुष), मार्च (५४ महिला, ३७ पुरुष), एप्रिल (१८ महिला, ७ पुरुष), मे (२९ महिला, १३ पुरुष), जून (६३ महिला, २४ पुरुष), जुलै (६३ महिला, ३१ पुरुष), ऑगस्ट (५८ महिला, २६ पुरुष), सप्टेंबर (६४ महिला, ३७ पुरुष), ऑक्टोबर (६३ महिला, ४४ पुरुष), नोव्हेंबर (२२ महिला १५ पुरुष), डिसेंबर (६१ महिला, ३४ पुरुष अशा ९४९ व्यक्ती बेपत्ता झाल्या आहेत.

Web Title: 1300 persons missing under 32 police stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.