ग्रामपंचायत निवडणुका शांततेत, भयमुक्त होण्यासाठी १३४ जणांना पंढरपूर तालुक्यातून हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 11:11 AM2021-01-13T11:11:28+5:302021-01-13T11:12:06+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यामध्यील ७१ गावांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लोकशाही मार्गाने, शांततेने व भयमुक्त वातावरणात पार पाडण्याकरीता गुन्हेगार वृत्तीच्या १३४ जणांना १४ जानेवारी ते १९ जानेवारीपर्यंत हद्दपार करण्यात आले आहे.
पंढरपूर शहर पोलिस ठाणे अंतर्गत १०७ कलम नुसार ५८ जणांकडून चांगल्या तुमचे वर्तणुकीचे बाँड घेण्यात आले आहेत. ११० कलम नुसार ३ जणांवर व महाराष्ट्र प्रोव्हीशन कलम ९३ प्रमाणे ३३ जणांवर कारवाई केली.
पंढरपूर तालुका पोलिस ठाणे अंतर्गत १०७ कलम नुसार ८० जणांवर, ११० कलम नुसार ३४ जणांवर, १४४(२) कलम नुसार ६२ जणांवर, १४९ कलम नुसार ४२९ जणांवर व महाराष्ट्र प्रोव्हीशन कलम ९३ प्रमाणे १७ जणांवर प्रतिबंधक कारवाई केली.
पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाणे अंतर्गत १०७ कलम नुसार २५ जणांवर, ११० कलम नुसार १३ जणांवर, १४४(२) कलम नुसार ३२ जणांवर, १४९ कलम नुसार ३६६ जणांवर व महाराष्ट्र प्रोव्हीशन कलम ९३ प्रमाणे १५ जणांवर प्रतिबंधक कारवाई केली.
करकंब पोलिस ठाणे अंतर्गत १०७ कलम नुसार ५८ जणांवर, ११० कलम नुसार ७ जणांवर, १४४(२) कलम नुसार ४० जणांवर, १४९ कलम नुसार १२८ जणांवर प्रतिबंधक कारवाई केली.
ही कारवाई पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक अरुण पवार, पोलीस निरीक्षक किरण
अवचर, पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, सहा.पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील यांनी केलेली आहे.
◼️ ६ वाळू माफिया हद्दपार
पंढरपूर शहर पोलीस ठाणे हददीतील वाळूविषयक वारंवार गुन्हे केलेले पंढरपूर शहरातील ४ व ग्रामीण भागातील १ अशा एकूण ६ जणांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६(१)(अ)(ब) प्रमाणे हद्दपारीची कारवाई केली आहे. यामध्ये सुरज विष्णू पवार (रा. जुनी वडार गल्ली, पंढरपूर), महादेव बाळू काळे (रा. जुनी वडार गल्ली,पंढरपूर), राजू उर्फ रामा तिम्मा बंदपटटे (रा. संतपेठ , पंढरपूर), लहू बाबू चव्हाण (रा. ज्ञानेश्वर नगर झोपडपटटी, पंढरपूर), नागेश शिवाजी घोडके (रा.बोहाळी, ता.पंढरपूर), ऋतिक उर्फ दादा अरुण लामकाने (रा. पिराची कुरोली, ता.पंढरपूर) यांचा सहभाग आहे.
◼️ पंढरपूर उपविभागात एवढी कारवाई
पंढरपूर पोलिस उपविभागात १०७ कलम नुसार ३२८ जणांवर, ११० कलम नुसार १६७ जणांवर, १४४(२) कलम नुसार १३४ जणांवर, १४९ कलम नुसार १०७२ जणांवर व महाराष्ट्र प्रोव्हीशन कलम ९३ प्रमाणे ६५ जणांवर प्रतिबंधक कारवाई केली. आगामी निवडणुक शांततेने, भयमुक्त वातावरणात पार-पाडण्याकरीता वरील प्रमाणे प्रतिबंधक कारवाई पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे.