जिल्ह्यात १३८ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:48 AM2020-12-05T04:48:20+5:302020-12-05T04:48:20+5:30

महापालिका आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या ९१५ अहवालात केवळ १७ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात ६ जण संपर्कातील तर इतर ...

138 positive in the district | जिल्ह्यात १३८ जण पॉझिटिव्ह

जिल्ह्यात १३८ जण पॉझिटिव्ह

googlenewsNext

महापालिका आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या ९१५ अहवालात केवळ १७ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात ६ जण संपर्कातील तर इतर ११ मध्ये सर्दी, पडसे अशी लक्षणे आढळली आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये विष्णूमिल चाळ परिसरातील ६८ व जुळे सोलापुरातील शिवगंगानगरातील ६४ आणि दाजीपेठेतील मंजुनाथनगरात राहणाऱ्या ५५ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. अशाप्रकारे शहरातील पॉझिटिव्हची एकूण संख्या १० हजार ४९० तर मृत्यूची संख्या ५६७ इतकी झाली आहे. ९ हजार ५२५ जण कोरोनामुक्त झाले असून, केवळ ३९८ जण उपचार घेत आहेत.

जिल्हा आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या ३ हजार २६९ अहवालात १२१ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथील ७५ वर्षीय वृद्ध तर दक्षिण सोलापुरातील हत्तूर येथील ७२ आणि सांगोला तालुक्यातील शिवणे येथील ९२ वर्षांच्या वृद्धेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्हची एकूण संख्या ३६ हजार १० तर मृतांची संख्या १ हजार ५० इतकी झाली आहे. ३३ हजार ४२७ जण कोरोनामुक्त झाले आहेत तर अद्याप १ हजार ५३३ जण उपचार घेत आहेत.

-

शहरात ४ हजारांपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र

सोलापूर शहरात प्रतिबंधित क्षेत्राची संख्या ३ हजार ८२0 इतकी झाली आहे. प्रतिबंधित क्षेत्राचे नियम शिथिल केल्याने त्याचा प्रभाव सध्या जाणवत नाही. फक्त पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींच्या घरापुरताच हा विषय मर्यादित करण्यात आला आहे.

Web Title: 138 positive in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.