१३८ जागा अन् सहा ग्रामपंचायती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:11 AM2021-01-08T05:11:26+5:302021-01-08T05:11:26+5:30

तालुक्यात ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ५६९ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. १२ ...

138 seats and six Gram Panchayats unopposed | १३८ जागा अन् सहा ग्रामपंचायती बिनविरोध

१३८ जागा अन् सहा ग्रामपंचायती बिनविरोध

Next

तालुक्यात ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ५६९ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. १२ वाॅर्डातील ३६ जणांना बिनविरोध निवडून येण्याची लॉटरी लागली. तहसीलदार अमोल कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक अर्जांची छाननी करण्यात आली.

ग्रामपंचायतनिहाय बिनविरोध सदस्य बोरामणी १६, संगदरी ८, दिंडूर ९, लिंबीचिंचोळी ९, तीर्थ ९, बाळगी ९, लवंगी ३, बरूर ६, हत्तरसंग ८, संजवाड ४, वडकबाळ ३, माळकवठे १, कारकल, कणबस ६, टाकळी २, औराद १, बोळकवठे १, अकोले (मं) २, वडापूर १, येळेगाव ३, यत्नाळ ३, वडगाव-शिरपनहळ्ळी २, सिंदखेड १, बोरूळ ३, मुळेगाव १, हणमगाव ५.

-------

बिनविरोध ग्रामपंचायती ६ : बोरामणी, संगदरी, दिंडूर, लिंबीचिंचोळी, तीर्थ, बाळगी

बिनविरोध सदस्यसंख्या : १३८

अर्ज माघारांची संख्या : ५६९

निवडणूक रिंगणातील उमेदवार : ८३५

Web Title: 138 seats and six Gram Panchayats unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.