भोसे ग्रामपंचायतीचे १४ उमेदवार अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:16 AM2021-01-01T04:16:45+5:302021-01-01T04:16:45+5:30

तालुक्यामध्ये २३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू आहे, त्यामध्ये भोसे ग्रामपंचायतीसाठी पाच प्रभागातून ६० उमेदवारी अर्ज दाखल झाले. या उमेदवारांकडे शौचालय ...

14 candidates of Bhose Gram Panchayat disqualified | भोसे ग्रामपंचायतीचे १४ उमेदवार अपात्र

भोसे ग्रामपंचायतीचे १४ उमेदवार अपात्र

Next

तालुक्यामध्ये २३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू आहे, त्यामध्ये भोसे ग्रामपंचायतीसाठी पाच प्रभागातून ६० उमेदवारी अर्ज दाखल झाले. या उमेदवारांकडे शौचालय आहे, तशी नोंद ग्रामपंचायतीकडे आहे, तरीही छाननीच्या वेळी पाच प्रभागातील प्रभाग एकमध्ये ३, २ मध्ये ४, प्रभाग ३ मध्ये १, प्रभाग ४ मध्ये ४ आणि प्रभाग पाचमधील ६ इतक्या उमेदवारांच्या अर्जाला हरकत घेण्यात आली, त्यामुळे आखाड्यात आता ४३ अर्ज शिल्लक राहिले.

हरकतीमध्ये या उमेदवारांकडे शौचालय नाही व काही उमेदवारांनी ग्रामपंचायतीकडे ठेकेदारी स्वरूपाचे काम केल्याचे पुरावे म्हणून ग्रामसेवकांचे दाखले जोडण्यात आले; परंतु या दाखल्याबाबत या ग्रामपंचायतीकडे दोन ग्रामसेवकांनी कामकाज केले असून, संबंधित ग्रामसेवकांनी दाखल्याबाबत हात वर केले. हरकतीसाठी घेतलेले दाखले नेमके कुणाच्या सहीचे, हा प्रश्न अपात्र उमेदवारांना छाननी पडला.

--- वेळ निघून गेल्याने अपात्र--

दरम्यान, याबाबत हरकतीसाठीचे ग्रामसेवकासोबत झालेले फोन रेकाॅर्ड व व्हाॅट्‌सॲपवर टाकलेले मेसेज पुरावे तहसीलदारांकडे दाखवण्यात आले; परंतु हरकती घेण्याची वेळ निघून गेल्याने १४ उमेदवार अपात्र झाले.

-----कोट----

ग्रामपंचायतीच्या ‘८ अ’ला शौचालयाची नोंद आहे. शिवाय ग्रामपंचायतीकडे ठेकेदारी केली नाही. ग्रामसेवकांच्या बनावट सहीचे दाखले जोडून उमेदवाराला अपात्र करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी न्यायालयात दाद मागू.

- कर्मवीर आवताडे, भोसे

Web Title: 14 candidates of Bhose Gram Panchayat disqualified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.