जुगार खेळणाऱ्या १४ जणांना घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:03 AM2021-02-20T05:03:41+5:302021-02-20T05:03:41+5:30
आलेगाव येथील सिध्दनाथ मंदिराच्या शेजारील पत्र्याच्या शेडजवळ काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांना मिळाली ...
आलेगाव येथील सिध्दनाथ मंदिराच्या शेजारील पत्र्याच्या शेडजवळ काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशान्वये पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय बगाडे, पोलीस नाईक विशाल लेंडवे, पोलीस नाईक संजयकुमार पवार, पोलीस कॉन्सटेबल सचिन देशमुख, पोलीस कॉन्सटेबल शिवाजी काळेल, पोलीस कॉन्सटेबल राहुल देशमुख, पोलिस कॉन्सटेबल धुळदेव चोरमले यांनी अचानक छापा टाकला.
यावेळी लक्ष्मण यादव, सचिन नवघरे, श्रीनाथ जाधव, पोपट गडहिरे, सरदार कांबळे, महेश भोसले, सागर कसबे, माणिक कांबळे, जयसिंग गडहिरे, भारत कोकाटे, सुधाकर बाबर, गणेश माने, कुंडलिक कांबळे, गजेंद्र पाटील (सर्व रा. आलेगाव, ता. सांगोला) हे गोल रिंगण करून मन्ना नावाचा जुगार खेळताना मिळून आले. याप्रकरणी पोकॉ धुळदेव चोरमले यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी १४ जणांविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.