चिंचोली-वाघमोडेवाडी येथे वीज कोसळून १४ शेळ्या-मेंढ्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:17 AM2021-05-31T04:17:20+5:302021-05-31T04:17:20+5:30

वाघमोडे वस्ती येथील मेंढपाळ शिवाजी गडदे यांचा शेळी-मेंढीपालन व्यवसाय आहे. त्यांनी शनिवारी दिवसभर शेळ्या-मेंढ्यांना चारून सायंकाळी ६ च्या सुमारास ...

14 goats and sheep killed in lightning strike at Chincholi-Waghmodewadi | चिंचोली-वाघमोडेवाडी येथे वीज कोसळून १४ शेळ्या-मेंढ्या ठार

चिंचोली-वाघमोडेवाडी येथे वीज कोसळून १४ शेळ्या-मेंढ्या ठार

Next

वाघमोडे वस्ती येथील मेंढपाळ शिवाजी गडदे यांचा शेळी-मेंढीपालन व्यवसाय आहे. त्यांनी शनिवारी दिवसभर शेळ्या-मेंढ्यांना चारून सायंकाळी ६ च्या सुमारास घराशेजारील वाडग्यात कोंडले. रात्री ९ च्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली. यावेळी त्यांच्या वाडग्यावर वीज कोसळल्याने ११ लहान-मोठ्या मेंढ्या व २ शेळ्यांसह १ लहान पाठ अशा १४ शेळ्या-मेंढ्या मृत्यू पावल्या.

या घटनेची माहिती पोलीसपाटील हरिदास बेहेरे-पाटील यांनी तहसीलदार अभिजित पाटील यांना दिली. तलाठी विकास माळी यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत शेंळ्या-मेंढ्याचा पंचनामा केला. पशुधन विकास अधिकारी डॉ. श्रीकांत सुर्वे यांनी शेळ्या-मेंढ्याचे शवविच्छेदन केले. यावेळी पोलीसपाटील हरिदास बेहेरे, परिचर दयानंद केंगार, मेंढपाळ शिवाजी गडदे उपस्थित होते.

फोटो ओळ ::::::::::::::

चिंचोली-वाघमोडे वाडी येथे वाडग्यावर वीज कोसळून शेळ्या-मेंढ्या ठार झाल्या.

Web Title: 14 goats and sheep killed in lightning strike at Chincholi-Waghmodewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.