सोलापूरातील सेवानिवृत्त कृषी अधिकाºयास १.४ कोटी रुपयांचा गंडा, दिल्लीच्या सात जणांविरूध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 02:32 PM2018-02-23T14:32:07+5:302018-02-23T14:35:04+5:30

निवृत्त उपविभागीय कृषी अधिकारी सखाराम केसकर यांच्याकडून विमा पॉलिसीचे हप्ते आणि नवीन पॉलिसीज्च्या नावाखाली १ कोटी ४ लाख रूपये उकळून फसवणूक केली.

1.4 million rupees for retired agricultural officer in Solapur, seven cases filed against Delhi Police | सोलापूरातील सेवानिवृत्त कृषी अधिकाºयास १.४ कोटी रुपयांचा गंडा, दिल्लीच्या सात जणांविरूध्द गुन्हा दाखल

सोलापूरातील सेवानिवृत्त कृषी अधिकाºयास १.४ कोटी रुपयांचा गंडा, दिल्लीच्या सात जणांविरूध्द गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देयाप्रकरणी दिल्लीच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. केसकर यांची ही फसवणूक  २०११ ते २०१८ दरम्यान करण्यात आली होती.विराज मल्होत्राने  फिर्यादी केसकर यांना  बिर्ला सनलाईफ, श्रीराम लाईफ इन्शुरन्स, भारती एक्सा लाईफ इन्शुरन्स आणि एचडीएफसी लाईफ या विमा कंपनीच्या प्रत्येकी दोन पॉलिसी व श्रीराम लाईफ इन्शुरन्स या कंपनीच्या तीन पॉलिसी घेण्याची गळ घातली


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २३  :  निवृत्त उपविभागीय कृषी अधिकारी सखाराम केसकर यांच्याकडून विमा पॉलिसीचे हप्ते आणि नवीन पॉलिसीज्च्या नावाखाली १ कोटी ४ लाख रूपये उकळून फसवणूक केली. याप्रकरणी दिल्लीच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. केसकर यांची ही फसवणूक  २०११ ते २०१८ दरम्यान करण्यात आली होती.
 या प्रकरणी केसकर (वय ६४,रा. नई जिंदगी रोड) यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून विराज मल्होत्रा (रा.गुडगाव नोएडा, दिल्ली), सुमित रंजन, आकाश बिडला, सुमित अग्रवाल, अंजली शर्मा, आरती नारंग, रिचा भटनागर व त्याचे इतर सहकाºयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विराज मल्होत्राने  फिर्यादी केसकर यांना  बिर्ला सनलाईफ, श्रीराम लाईफ इन्शुरन्स, भारती एक्सा लाईफ इन्शुरन्स आणि एचडीएफसी लाईफ या विमा कंपनीच्या प्रत्येकी दोन पॉलिसी व श्रीराम लाईफ इन्शुरन्स या कंपनीच्या तीन पॉलिसी घेण्याची गळ घातली. आरोपीने केसकर यांना पॉलिसींची रक्कम आरोपींच्या बँक खात्यांवर भरावयास सांगितली. त्यानुसार केसकर यांनी गेल्या सात वर्षात  १ कोटी ४ लाख ८६ हजार ४७० रूपये  महाराष्ट्र बँक, ‘आयसीआयसीआय’ बँक व स्टेट बँक आॅफ इंडिया, सिंडिकेट बँकेच्या धनादेशाव्दारे त्यांच्या   बँक खात्यांवर आरटीजीएस/ एमईएफटी ‘डीडी’ व्दारे भरली शिवाय काही रक्कम रोख स्वरुपातही  भरली; मात्र आरोपींने ही रक्कम पॉलिसीज्मध्ये न भरता स्वत:च्या फायद्यासाठी वापरली. त्यानंतर इन्शुरन्स कस्टमर बोनस डीपार्टमेंट या खात्याचे पॉलिसी मॅच्युअर असल्याचे  खोटे पत्र ई-मेलव्दारे पाठवून दिले. मात्र विमा कंपन्यांकडून कोणताही ई - मेल आला नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आपली फसवणूक झाली, हे  केसकर यांच्या ध्यानात आले. त्यानंतर त्यांनी ही फिर्याद दिली.
---------------------------
फोन आला अन् फसवणुकीस सुरुवात
- केसकर  हे कृषी खात्यात नोकरीस असताना आयकर सवलत मिळण्यासाठी मंदार देखणे (रा. रत्नागिरी) यांच्याकडे बिर्ला कंपनीची एक पॉलिसी घेतली होती. त्यावेळी मंदार यांच्यासोबत आलेले खांडेकर आणि जांभळे यांची ओळख फिर्यादीबरोबर झाली होती. फेब्रुवारी २०११ मध्ये विराज मल्होत्रा याने केसकर यांना दूरध्वनी करुन जांभळे आणि खांडेकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन संपर्क साधत असल्याचे सांगितले. 
- आपण  बिर्ला सनलाईफ आणि श्रीराम लाईफ इन्शुरन्स मध्ये इन्शुरन्स अ‍ॅडव्हायजर म्हणून काम करत असल्याचे मल्होत्रा याने केसकरांना सांगितले. आर्थिक लाभाचे अमीष दाखवून  वेगवेगळ्या कंपन्यांच्या पॉलिसीज् मल्होत्राने  केसकर यांच्या गळी उतरविल्या आणि त्यांच्याकडून पैसे उकळून फसवणूक केली.

Web Title: 1.4 million rupees for retired agricultural officer in Solapur, seven cases filed against Delhi Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.