महापरिनिर्वाण दिनासाठी रेल्वेच्या १४ विशेष ट्रेन धावणार

By Appasaheb.patil | Published: November 30, 2022 06:41 PM2022-11-30T18:41:37+5:302022-11-30T18:46:21+5:30

मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर व हार्बर मार्गावर १२ उपनगरी विशेष गाड्या

14 special trains of railways will run for Mahaparinirvana day | महापरिनिर्वाण दिनासाठी रेल्वेच्या १४ विशेष ट्रेन धावणार

महापरिनिर्वाण दिनासाठी रेल्वेच्या १४ विशेष ट्रेन धावणार

Next

सोलापूर - महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य आणि देशभरातून अनेक भाविक मुंबईत येत असतात. त्यांना रेल्वे स्थानकात अधिकाधिक सोयी उपलब्ध करून, त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यासाठीचे निर्देश रेल्वे राज्यमंत्र्यांनी दिले असून मध्य रेल्वे विभागाकडून १४ विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत. शिवाय  मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर व हार्बर मार्गावर १२ उपनगरी विशेष गाड्या चालविण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील, सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी, पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक प्रकाश बुटानी यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपापल्या विभागांतील घेण्यात आलेल्या पूर्वतयारीचे रेल्वे राज्यमंत्र्यांना सादरीकरण केले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री अनिल कुमार लाहोटी यांनी स्पष्ट केले कि, महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या भाविकांना पूर्व नियोजित ब्लॉकचा कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल तसेच नियमित सेवा चालूच राहतील. 

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेतर्फे १४ अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. तसेच आदिलाबाद - मुंबई ट्रेनला १ अतिरिक्त कोचही जोडण्यात येणार आहे. मुंबईतील दादर तसेच अन्य स्थानकांवर एकाच वेळी होणाऱ्या गर्दीतील प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची विशेष ड्युटी देण्यात येईल अशी माहिती प्रधान मुख्य वाणिज्यिक व्यवस्थापक मनिजीत सिंह यांनी दिली.

Web Title: 14 special trains of railways will run for Mahaparinirvana day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे