बाजार समिती निवडणुकीसाठी बार्शी तालुक्यातील १४ हजार शेतकरी राहणार मतदानापासून वंचित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 01:23 PM2018-02-13T13:23:37+5:302018-02-13T13:25:15+5:30
सामायिक खात्यावरील एकाच शेतकºयाची नोंद बाजार समिती निवडणुकीच्या मतदार यादीत घेण्याच्या सहकार आणि पणन विभागाच्या निर्णयाचा फटका बार्शी तालुक्यातील १४ हजार ५० शेतकºयांना बसला आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १३ : सामायिक खात्यावरील एकाच शेतकºयाची नोंद बाजार समिती निवडणुकीच्या मतदार यादीत घेण्याच्या सहकार आणि पणन विभागाच्या निर्णयाचा फटका बार्शी तालुक्यातील १४ हजार ५० शेतकºयांना बसला आहे. या शेतकºयांना बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत १० गुंठ्यावर शेतजमीन असलेल्या शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय सहकार, पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी घेतला आहे. मतदार यादी तयार करताना ८ अ उताºयाचा आधार घेतला जात आहे. एकाच उताºयावर अनेकांची नावे असतील तर नेमके कोणाचे नाव मतदार यादीत घ्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर सहकार आणि पणन विभागाने उताºयावरील पहिल्या क्रमांकाच्या व्यक्तीचे नाव मतदार यादीत घेण्याचे आदेश दिले होते. बार्शी बाजार समितीच्या गण रचनेची सोडत काढण्यापूर्वी महसूल प्रशासनाने बार्शी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील ९० हजार ५०४ शेतकरी मतदारांची यादी सादर केली होती. ही यादी उताºयावरील सर्वच खातेदारांची नोंद घेऊन करण्यात आली होती. परंतु नव्याने आदेश आल्यानंतर १४ हजार ५० शेतकºयांची नावे वगळण्यात आली आहेत. ही यादी बाजार समितीकडे पाठविण्यात येणार आहे.
------------------------
१५ मार्चपर्यंत होतील निवडणुका
- च्जिल्हा निवडणूक कार्यालयाने उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी मतदारांची यादी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाला दिली आहे. यावर हरकती मागविण्यात येणार आहेत. बार्शी बाजार समितीचीही यादी जवळपास तयार झाली आहे. उच्च न्यायालयाने या दोन्ही बाजार समित्यांच्या निवडणुकीबाबत कालमर्यादा ठरवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर १५ मार्चपर्यंत या दोन्ही बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता जिल्हा निवडणूक कार्यालयाने वर्तविली आहे.