१४ हजाराची वाळूूू अन्‌ साडेनऊ लाखांची वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:41 AM2021-03-13T04:41:10+5:302021-03-13T04:41:10+5:30

पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रताप वसगडे सहा. फौजदार संजय राऊत, लतीब मुजावर, पोलीस हेड कॉन्स्टेबल ...

14 thousand sand and nine and a half lakh vehicles seized | १४ हजाराची वाळूूू अन्‌ साडेनऊ लाखांची वाहने जप्त

१४ हजाराची वाळूूू अन्‌ साडेनऊ लाखांची वाहने जप्त

googlenewsNext

पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रताप वसगडे सहा. फौजदार संजय राऊत, लतीब मुजावर, पोलीस हेड कॉन्स्टेबल तानाजी लिंगडे, पोलीस कॉन्स्टेबल धुळा चोरमले, पोलीस नाईक विकास क्षीरसागर, पोलीस नाईक महेश पवार, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धनाथ शिंदे, काशीद हे पेट्रोलिंग करत होते.

महिम-भाळवणी रोडवर बिगर नंबरचा ट्रॅक्टर येत असताना थांबवून चालक संदीप शंकर शेंडे (रा. महिम) याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने विनापरवाना ओढ्यातून वाळू आणली असल्याचे सांगितले. पोलिसांनी ७ लाख रुपयांचा ट्रॅक्टर, ५० हजार रुपयांची डंपिग ट्रॉली, ६ हजार रुपयांची वाळू असा ७ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सोनंद ते लक्ष्मीनगर रस्त्यावर विना नंबरचा टेम्पो थांबवून चौकशी केली असता चालक विलास बापू हिप्परकर (रा. सिंघनहळ्ळी, ता. जत) याने चोरून वाळू आणल्याचे सांगितले. पोलिसांनी ५० हजार रुपयांचा टेम्पो व ४ हजार रूपयांची अर्धा ब्रास वाळू असा ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

कमलापूर ते अजनाळे रस्त्यावर बिगर नंबरचा टेम्पो संशय आल्याने थांबवून पाहणी केली असता त्यात वाळू मिळून आली. चालक ओंकार शिवाजी भोसले (रा. सांगोला) यांच्याकडे चौकशी केली असता त्याने चोरून वाळू आणल्याचे सांगितले. पोलिसांनी १ लाख ५० हजार रुपयांचा टेम्पो व ४ हजार रुपयांची अर्धा ब्रास वाळू असा १ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संदीप शंकर शेंडे, विलास बापू हिप्परकर, ओंकार शिवाजी भोसले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 14 thousand sand and nine and a half lakh vehicles seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.