११ दिवसात १४३ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:20 AM2021-04-12T04:20:30+5:302021-04-12T04:20:30+5:30
उत्तर सोलापूर : तालुक्यात कोरोना झपाट्याने वाढत असून एप्रिल महिन्यात ११ दिवसात १४३ व्यक्ती बाधित झाले आहेत. कळमण, कौठाळी, ...
उत्तर सोलापूर : तालुक्यात कोरोना झपाट्याने वाढत असून एप्रिल महिन्यात ११ दिवसात १४३ व्यक्ती बाधित झाले आहेत. कळमण, कौठाळी, वडाळा व रानमसले गावात रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.
एक एप्रिल रोजी उत्तर सोलापूर तालुक्यातील कोरोना बाधित संख्या ९२६ इतकी होती ती ११ एप्रिल रोजी १०६९ इतकी झाली आहे. ११ दिवसात १४३ रुग्णांची वाढ झाली त्यामध्ये एकट्या कळमण आरोग्य केंद्रातील गावात ६९ रुग्णांची भर पडली आहे.
त्यानंतर कळमणला २४, कौठाळी १६, वडाळा १२, रानमसले ७, बीबीदारफळ व नान्नज प्रत्येकी तीन कोरोना बाधित वाढले आहेत. कोंडी आरोग्य केंद्रातील गावात १८ तर मार्डी व तिर्हे आरोग्य केंद्राअंतर्गत गावात प्रत्येकी ३३ रुग्णसंख्या वाढली आहे.
---
बीडीओही कोरोना बाधित
उत्तर सोलापूर तालुक्याच्या गटविकास अधिकारी जस्मीन शेख व कक्ष अधिकारी एन.व्ही. ओतारी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. वडाळा, मार्डी व कोंडी येथे लसीकरण सुरू असले तरी कोडी आरोग्य केंद्रात लसीसाठी गर्दी होत असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी सांगितले.