करवसुली विशेष मोहिमेत सोलापूर महानगरपालिकेच्या तिजोरीत १५ कोटी जमा, दंडमाफीची सवलत संपली, वसुली सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 01:26 PM2018-01-02T13:26:41+5:302018-01-02T13:29:18+5:30

मनपाने थकीत मिळकतकर वसुलीसाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत १४ कोटी ९८ लाख रुपये मनपाच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

15 crore deposits of Solapur Municipal Corporation, Dedemapi concession ended, recovery will continue | करवसुली विशेष मोहिमेत सोलापूर महानगरपालिकेच्या तिजोरीत १५ कोटी जमा, दंडमाफीची सवलत संपली, वसुली सुरूच राहणार

करवसुली विशेष मोहिमेत सोलापूर महानगरपालिकेच्या तिजोरीत १५ कोटी जमा, दंडमाफीची सवलत संपली, वसुली सुरूच राहणार

Next
ठळक मुद्दे१५ डिसेंबरपासून मिळकतकराची थकबाकी वसुली मोहीम सुरू करण्यात आली होती.पाच प्रमुख विभागीय पथकांमध्ये ४५८ कर्मचाºयांनी कर वसुलीची मोहीम राबविलीकर्मचारी ५२ छोट्या गटांमार्फत झोनमध्ये जाऊन वसुलीच्या कामाला लागले होतेथकबाकी न भरणाºयांचे ९ नळ तोडण्यात आले तर १ मिळकत सील करण्यात आली.   


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २  : मनपाने थकीत मिळकतकर वसुलीसाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत १४ कोटी ९८ लाख रुपये मनपाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. 
१५ डिसेंबरपासून मिळकतकराची थकबाकी वसुली मोहीम सुरू करण्यात आली होती. यात पाच प्रमुख विभागीय पथकांमध्ये ४५८ कर्मचाºयांनी कर वसुलीची मोहीम राबविली. हे कर्मचारी ५२ छोट्या गटांमार्फत झोनमध्ये जाऊन वसुलीच्या कामाला लागले होते. शेवटच्या दिवशी कोणतीही विश्रांती न घेता कर्मचाºयांनी वसुली मोहीम राबविली. यात शहर विभागात ९५ लाख १७ हजार ६९0 रुपये रोख तर ३४ लाख ६९ हजार २५१ रुपये धनादेशाद्वारे जमा करण्यात आले. हद्दवाढ विभागात ८७ लाख ४४ हजार ८२0 रुपये रोख तर १२ लाख ७२ हजार ९९६ रुपये धनादेशाद्वारे जमा करण्यात आले. थकबाकी न भरणाºयांचे ९ नळ तोडण्यात आले तर १ मिळकत सील करण्यात आली.   
१५ ते ३0 डिसेंबरच्या कालावधीत राबविलेल्या मोहिमेत शहर विभागातून रोख ५ कोटी ५२ लाख २७ हजार ९0४ रुपये तर २ कोटी ३७ लाख ७४ हजार ३0२ रुपये धनादेशाद्वारे जमा झाले. हद्दवाढ भागातून ५ कोटी ४३ लाख ७३ हजार १८७ रुपये रोख तर १ कोटी ६४ लाख ६८ हजार ९७२ रुपये धनादेशाद्वारे जमा झाले. अशाप्रकारे शहरातून ७ कोटी ९0 लाख २ हजार २0६ तर हद्दवाढ विभागातून ७ कोटी ८ लाख ४२ हजार १५९ रुपये असे एकूण १४ कोटी ९८ लाख ४४ हजार ३६५ रुपये मनपाच्या तिजोरीत जमा झाले. मोहिमेत थकबाकी न भरणाºयांचे शहरी विभागात १७९ व हद्दवाढमध्ये ८३ असे २६२ जणांचे नळ तोडण्यात आले तर दोन्ही विभागात मिळून ३८ मिळकती सील करण्यात आल्या.   
-----------------
दंड,व्याजाची सवलत संपली
- मोहीम काळात दंड व व्याज आकारणीत एक टक्का सवलत देण्यात आली होती. १ जानेवारीपासून ही सवलत बंद करण्यात आल्याचे उपायुक्त त्रिंबक ढेंगळे—पाटील यांनी सांगितले. विविध विषयांच्या बैठकांसाठी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे हे मुंबईत आहेत. करवसुलीसाठी मोहिमेसाठी घेण्यात आलेले २00 कर्मचारी त्यांच्या कामाच्या ठिकाणी आजपासून रुजू झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या विभागातील खोळंबलेली कामे मार्गी लागणार आहेत; मात्र करसंकलन विभागाच्या कर्मचाºयांवर वसुली मोहीम कायम ठेवण्यात येणार आहे. 

Web Title: 15 crore deposits of Solapur Municipal Corporation, Dedemapi concession ended, recovery will continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.