पुणे विभागातील १५ साखर कारखान्यांकडे ‘एफआरपी’ चे १५१ कोटीची थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 10:52 AM2018-09-20T10:52:32+5:302018-09-20T10:57:06+5:30
पुणे विभागातील एफआरपी : सोलापूरच्या ११ कारखान्यांकडील ९० कोटींचा समावेश
अरूण बारसकर
सोलापूर: पुणे विभागातील सोलापूर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांकडे मागील वर्षीच्या उसाचे ‘एफआरपी’ नुसार(किमान व किफायतशीर दर) १५१ कोटी ५५ लाख १८ हजार रुपये इतके शेतकºयांचे देणे थकले आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांकडील ९० कोटी ७० लाख ८ हजार रुपयांचा समावेश आहे, अशी माहिती साखर संचालकांच्या कार्यालयातून देण्यात आली.
२०१७-१८ चा ऊस गळीत हंगाम मार्च २०१८ मध्ये संपला. गाळप संपल्यापासून शेतकºयांचे उसाचे पैसे देण्याची मागणी सातत्याने केली जात आहे; मात्र काही साखर कारखान्यांनी एफआरपीनुसारही शेतकºयांचे पैसे दिले नाहीत. मागील वर्षी पुणे विभागातील पुणे जिल्ह्यातील १७, साताराच्या १५ व सोलापूरच्या ३१ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. यामध्ये गोकुळ माऊली साखर कारखान्याने चाचणी हंगाम घेतल्याने १३ हजार १४८ मे.टन गाळप झाले होते.
पुणे विभागातील गाळप घेतलेल्या ६३ पैकी ४८ साखर कारखान्यांनी ‘एफआरपी’नुसार व काही कारखान्यांनी ‘एफआरपी’ पेक्षाही अधिक रक्कम ऊस उत्पादक शेतकºयांना दिली आहे. पुणे जिल्ह्यातील एका कारखान्याकडे ६ कोटी ७ लाख ४४ हजार तर सातारा जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांकडे ५५ कोटी ६ लाख ९६ हजार रुपये थकबाकी आहे. प्रादेशिक संचालक व साखर आयुक्तांनी शेतकºयांचे पैसे देण्याबाबत नोटिसा देऊनही कारखाने पैसे देण्यास तयार नाहीत. यापैकी काही साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांनी आरआरसीनुसार कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले असले तरी त्याला सहकारमंत्र्यांनीच स्थगिती दिली आहे. सहकारमंत्र्यांनी कारखान्यांना शेतकºयांचे पैसे देण्यासाठी संधी दिल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याने संपूर्ण थकीत रक्कम दिली आहे.
मातोश्री शुगरकडे सर्वाधिक थकबाकी
च्सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर साखर कारखान्याकडे २२ कोटी २४ लाख, संत दामाजी ४ कोटी २७ लाख ४९ हजार, विठ्ठल साखर कारखान्याकडे १९ कोटी ४० लाख ४७ हजार, मकाई साखर कारखान्याकडे एक कोटी ५९ लाख ४२ हजार, संत कूर्मदास कारखान्याकडे ६५ लाख ८२ हजार, सिद्धनाथ शुगरकडे ५ कोटी १२ लाख, गोकुळ शुगरकडे ५ कोटी ७१ लाख, मातोश्री लक्ष्मी शुगरकडे २३ कोटी ७१ लाख ५२ हजार, बबनराव शिंदे कारखान्याकडे एक कोटी ९६ लाख ५० हजार, जयहिंद शुगरकडे ६२ लाख तर विठ्ठल रिफाईन शुगरकडे ६ कोटी ९ लाख ७९ हजार रुपये इतकी थकबाकी आहे.
च्सातारा जिल्ह्यातील न्यू फलटणकडे ४८ कोटी ४१ लाख ८२ हजार, ग्रीन पॉवरकडे ४ कोटी ९ लाख ५७ हजार तर स्वराज इंडियाकडे दोन कोटी २५ लाख ५७ हजार तर पुणे जिल्ह्यातील राजगड कारखान्याकडे ६ कोटी ७ लाख ४४ हजार रुपये इतकी थकबाकी आहे.
लोकमंगल साखर कारखान्याने २२०० रुपयांप्रमाणे तर सिद्धेश्वरने १८०० रुपयांप्रमाणे पैसे देण्यास सुरुवात केली आहे. भीमा साखर कारखान्याने संपूर्ण थकबाकी दिली आहे. अन्य कारखान्यांनीही थकबाकी द्यावी यासाठी गुरुवारी सहकारमंत्र्यांना निवेदन देणार आहोत.
- महामूद पटेल,
जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना