१५ जणांना तीन दिवसांची कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:55 AM2021-01-13T04:55:00+5:302021-01-13T04:55:00+5:30
बार्शी : शहरात धस पिंपळगाव रस्त्यावरील कत्तलखान्यावर पोलिसांनी धाड टाकून चार जनावरांची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी ...
बार्शी : शहरात धस पिंपळगाव रस्त्यावरील कत्तलखान्यावर पोलिसांनी धाड टाकून चार जनावरांची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी १८ जणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्यापैकी तिघांची सोलापूरच्या बालनिरीक्षणगृहात रवानगी करण्यात आली तर १५ आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्या. आर. एस. धडके यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
८ जानेवारी रोजी केलेल्या या कारवाईत जर्सीगायी, लहान गायी, रेडे, आठ दुचाकी असा सुमारे दोन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. याबाबत प्राणीमित्र धनयकुमार पटवाजी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी धाड टाकून मोहमद सौदागर (वय ४२) , तहीर सौदागर (३३), इब्राहिम सौदागर (४९), मुनाफ सौदागर (३०), जमिल सौदागर (४०), जुलफेगार सौदागर (२३), फैयाज कुरेशी (२७) , मुद्दीन सत्तार सौदागर (४२), शाबाज सौदागर (२५), मोहद्दीन मुस्ताक सौदागर (३५), जैद मुनाफ शेख (१९), गफ्फार सौदागर (५२), सद्दाम रियाज सौदागर (२२) , नशीद फकीर सौदागर (३५), रियाज नजीर सौदागर (२७, सर्व रा. मंगळवार पेठ) या १५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सहाय्यक फौजदार सुधाकर ठाकर यांनी आरोपींना न्यायालयात उभे केले असता तीन दिवसांची कोठडी सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने ॲड. शेख यांनी काम पाहिले .