सोलापूरच्या १५ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळणार १ मे रोजी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह

By admin | Published: April 26, 2017 07:54 PM2017-04-26T19:54:32+5:302017-04-26T19:54:32+5:30

-

15 police officers and employees of Solapur will get the honor of the DGP on 1st May | सोलापूरच्या १५ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळणार १ मे रोजी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह

सोलापूरच्या १५ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळणार १ मे रोजी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह

Next


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर : आप्पासाहेब पाटील
महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल शहर व ग्रामीण पोलीस दलातील १५ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना १ मे रोजी पोलीस मुख्यालयाच्या संचलन मैदानावर पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रे प्रदान करावे अशा सुचना पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी परिपत्रकान्वये कळविले आहे़
पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक दिले जाते़ अशा पदक प्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे बोधचिन्ह व सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देण्यात येते़ २०१६ सालानुसार सोलापूर शहर व जिल्ह्यातील १५ पोलीसांना महासंचालकांचे बोधचिन्ह व सन्मानचिन्ह मिळणार आहे़ तसेच पोलीस महासंचालकांची सन्मानचिन्ह प्राप्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची दुसऱ्या घटकात बदली झालेली असेल तर अशा पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना योग्य त्या कार्यवाहीसाठी सुपूर्द करावेत अशाही सुचना महासंचाकांनी दिल्या आहेत़
--------------------------------
हे आहेत मानकरी
सिताराम राजाराम अनभुले : रा़रा़पो़बल गट १०
अर्जुन पांडूरंग कुंटेलु : रा़रा़पो़बल गट १०
अशोक भाऊराव हंबर्डे : रा़रा़पो़बल गट १०
भानुदास गणपती सुर्यवंशी : रा़रा़पो़बल गट १०
मोहन श्रीपती धुमाळ : रा़रा़पो़बल गट १०
सायबन्ना व्यंकय्या कोळी : सहा़ पोलीस निरीक्षक, सोलापूर ग्रामीण
राजकुमार रामप्रसाद परदेशी : पोलीस हवालदार, सोलापूर शहर पोलीस
विजयकुमार दिगंबर पावले : पोहेकॉ, ग्रामीण पोलीस, सोलापूर
अल्ताफ नुरमहंमद शेख : सोलापूर शहर पोलीस
दिनकर काशीनाथ खराडे : सोलापूर शहर पोलीस
अरूण मोहनराव पंचवाघ : सोलापूर शहर
संजय भगवान सर्जे : सोलापूर शहर
औदुंबर गोरख आटुळे : सोलापूर शहर
संतोष भगवान साबळे : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर
कोट़़़़़़़
१५ वर्षे विशेष सेवा करून गुन्हेगारी कमी करणे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चोखपणे हाताळणे, लोकांशी सुसंवाद अशा विविध वैशिष्टयांनी पूर्णपणे असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे पदक दिले जाते़ पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या चांगल्या कामांची पोचपावती आहे़ महासंचालकांचे सन्मानचिन्हासाठी शहर पोलीस दलातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती वरिष्ठ कार्यालयास पाठवून देण्यात आली होती़ त्यापैकी शहर व ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान होणार आहे़
अर्पणा गिते
पोलीस उपायुक्त, सोलापूर शहर पोलीस़

Web Title: 15 police officers and employees of Solapur will get the honor of the DGP on 1st May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.