कुर्डुवाडीत शिवजयंतीनिमित्त १५० जणांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:34 AM2021-02-23T04:34:53+5:302021-02-23T04:34:53+5:30
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त येथील शिवराय ज्वेलर्सच्या वतीने कोविडच्या काळात काम करणाऱ्या शेतकरी, माजी सैनिक, डॉक्टर्स, आरोग्य, स्वच्छता, पोलीस ...
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त येथील शिवराय ज्वेलर्सच्या वतीने कोविडच्या काळात काम करणाऱ्या शेतकरी, माजी सैनिक, डॉक्टर्स, आरोग्य, स्वच्छता, पोलीस यांसह विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी आदी १५० जणांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक व पूजन उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार राजेश चव्हाण, गटविकास अधिकारी डॉ.संताजी पाटील, मुख्याधिकारी समीर भूमकर, शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, बाबाराजे बागल, पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे, सपोनि चिमणाजी केंद्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनंदा रणदिवे, डॉ. प्रसन्न शहा, डॉ. प्रवीण पाटील, रविराज बागल, शिवराजे बागल, संभाजीराजे बागल आदी उपस्थित होते.
यावेळी डॉक्टर्स, आरोग्य, स्वच्छता, महसूल, पोलीस विभागातील अधिकारी- कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, पत्रकार यांच्यासह शेतकरी व माजी सैनिकांचा सन्मानपत्र, गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.
फोटो ओळ- २२ कुर्डुवाडी-कोरोना योद्धा
कुर्डुवाडीत शिवजयंतीनिमित्त शिवराय ज्वेलर्सच्या वतीने कोरोनायोद्धा म्हणून उपविभागीय अधिकारी जोती कदम यांचा सन्मान करताना बाबाराजे बागल.यावेळी इतर मान्यवर.