हद्दवाढ भागात एलईडी दिव्यांसाठी नव्याने १५०० खांब बसविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:42 AM2020-12-05T04:42:04+5:302020-12-05T04:42:04+5:30
शहर आणि हद्दवाढ भागातील पथदिव्यांवरील जुने दिवे बदलून एलईडी बल्ब बसविण्यात आले आहेत. यासोबतच हद्दवाढ भागात नव्याने साडेचार हजार ...
शहर आणि हद्दवाढ भागातील पथदिव्यांवरील जुने दिवे बदलून एलईडी बल्ब बसविण्यात आले आहेत. यासोबतच हद्दवाढ भागात नव्याने साडेचार हजार खांबही बसविण्याची वर्कऑर्डर देण्यात आली. एलईडीचे काम ईईएसएल कंपनीने तर खांब बसविण्याचे काम बजाज कंपनीकडून करून घेण्यात येत आहे. सध्या सुमारे ३५०० खांब बसवून झाले आहेत. एक हजार खांब बसविण्याचे काम सुरू आहे. त्यातच नगरसेवक, पदाधिकाऱ्यांकडून मागणी होत आहे. मनपाच्या विद्युत विभागाचे प्रमुख राजेश परदेशी यांच्याकडून नगरसेवकांनी दिलेली यादी घेण्यात येणार आहे. महावितरण कंपनीच्या मंजुरीनंतर या कामाची वर्कऑर्डर देण्यात येईल. सुमारे १५०० खांब बसविण्याचे नियोजन होईल. हद्दवाढ भागात रस्त्यावर कुठेही अंधार असू नये, असा प्रयत्न असल्याचे ढेंगळे-पाटील यांनी सांगितले.
पथदिव्यांना लावले टायमर
शहरातील एलईडी दिवे नियोजित वेळेत सुरू व्हावेत, यासाठी प्रत्येक खांबांना टायमर लावण्यात आले आहे. सायंकाळी साडेसहाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. पुढील काळात कंट्रोल रुममधून यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.