सोलापूर जिल्ह्याला १५२ कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:22 AM2021-02-10T04:22:23+5:302021-02-10T04:22:23+5:30
सोलापूर जिल्ह्यातील व माढा भागातील रेल्वेच्या नवीन कामे, दुरूस्ती या साठी एकूण जिल्ह्याला १४९ कोटी तर कुर्डूवाडी येथील रेल्वे ...
सोलापूर जिल्ह्यातील व माढा भागातील रेल्वेच्या नवीन कामे, दुरूस्ती या साठी एकूण जिल्ह्याला १४९ कोटी तर कुर्डूवाडी येथील रेल्वे डबा (व्याघन) कारखाना पूर्णत्वास नेण्यासाठी ३ कोटी रुपयांची मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडून बजेटमध्ये तरतूद करुन घेतली. या कामामध्ये खा. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्याही कामांचा मोठ्या प्रमाणात समावेश केला आहे.
कुर्डुवाडी येथील रेल्वे डब्याचा कारखाना १०० टक्के पूर्ण होऊन रेल्वेच्या रिकरूटमेंट बोर्डातर्फे ५०० कामगार भरती होणार आहे. या कामगार भरतीत स्थानिकांना संधी द्यावी, अशी मागणी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे ग्रामस्थ व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केंद्रीय रेल्वे विभागाकडे तशा आशयाच्या मागणीचाही पाठपुरावा सुरू केला आहे. करमाळ्यातील वाशिबें ते भिगवण २७ कि.मी.चे कामही मंजूर करून घेतले असून ते काम लवकरच सुरू होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी सांगितले.