वाळू वाहतूक करणारी १६ गाढवे पोलीस ठाण्याच्या आवारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:10 AM2021-01-08T05:10:22+5:302021-01-08T05:10:22+5:30
चंद्रभागा नदीवरील अहिल्या पूल, जुना दगडी पूल, रेल्वे पूल, पुंडलिक मंदिर परिसर, हिंदू स्मशानभूमी, विष्णूपद बंधारा, जॅकवेल या परिसरातून ...
चंद्रभागा नदीवरील अहिल्या पूल, जुना दगडी पूल, रेल्वे पूल, पुंडलिक मंदिर परिसर, हिंदू स्मशानभूमी, विष्णूपद बंधारा, जॅकवेल या परिसरातून सर्रास वाळू चोरी होते. यावर पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. यामुळे रिक्षा, ट्रॅक्टर, दुचाकी, कारमध्ये वाळू घेऊन जाणारी वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.
----
म्हणून होतोय गाढवांचा वापर
पंढरपूर शहरात छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. तेथे मोठी वाहने जाणे शक्य नाही. यामुळे वाळू वाहतुकीसाठी गाढवांचा वापर केला जातो. यामुळे जुना दगडी पूल ते हिंदू स्मशानभूमी परिसरात दररोज गाढवांद्वारे वाळू वाहतूक व विक्री केली जाते. पाळत ठेऊन पोलिसांनी सोमवारी १६ गाढवांना ताब्यात घेतले आहे. त्यांना पोलीस ठाण्याच्या आवारात बॅरिकेटिंगचा वापर करून ठेवले आहे.
----
गाढवे सोडवण्यासाठी कोणी आले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गाढवांच्या मालकांचा शोध घेण्याचेदेखील काम पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. अन्यथा अॅनिमल राहत संस्थेच्या मदतीने सोय असेल अशा ठिकाणी गाढवांना सोडण्यात येणार आहे.
- अरुण पवार, पोलीस निरीक्षक, पंढरपूर
----०४पंढरपूर----
पंढरपूर पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आलेली वाळू वाहतूक करणारी गाढवं.