अक्कलकोटमध्ये १७ दिवसांत युवकांनी कब्रस्तान केले चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:21 AM2021-04-16T04:21:25+5:302021-04-16T04:21:25+5:30
अक्कलकोट : अक्कलकोट येथील मुस्लीम कब्रस्तान सध्या चकाचक, सुंदर झाले आहे. मुस्लिम युवकांनी हातामध्ये झाडू, फावडा आणि टोपली घेऊन ...
अक्कलकोट : अक्कलकोट येथील मुस्लीम कब्रस्तान सध्या चकाचक, सुंदर झाले आहे. मुस्लिम युवकांनी हातामध्ये झाडू, फावडा आणि टोपली घेऊन १७ दिवस काम केले. आता कब्रस्तान नव्हे तर अभ्यासिकेची जागा वाटते.
अक्कलकोट येथील मुस्लीम युवकांना कब्रस्तान स्वच्छता करण्याची कल्पना सुचली. एकमेकांच्या प्रयत्नातून कब्रस्तान स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले. मुबारक कोरबू आणि रशीद खिस्तगे यांच्या नेतृत्वाखाली ही स्वच्छता करण्यात आली.
नगरसेवक सद्दाम शेरीकर, इरफान दावणा, मुबारक कोरबू, रशीद खिस्तके, तन्वीर सय्यद, सरफराज कमानघर ,मन्सूर सय्यद, तोशिप डांगे, आयान सुभेदार, लाला मणियार, वाहीद चाबुकस्वार, अल्ताफ ताची, इरफान मणियार, सोनू सुभेदार, सोहेल फरास, मोहन चाऊस, नवाज शेख, इमाम सय्यद, सरफराज शेख या सर्वांच्या प्रयत्नातून स्वच्छता करण्यात आली. १७ दिवस हे काम चालले. सात एकर जमीन असलेल्या या कब्रस्तानमध्ये हे काम अखंड राहिले आहे.
---
१५ कब्रस्तान
अक्कलकोट येथील मुस्लिम कब्रस्तानमध्ये युवकांनी १७ दिवस स्वच्छता मोहीम राबविली.