९४ पैकी १७ ग्रामपंचायती बिनविराेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:11 AM2021-01-08T05:11:39+5:302021-01-08T05:11:39+5:30
तालुक्यातील ९४ गावांतील ३०९ प्रभागांतील ८१३ सदस्यांसाठी ही निवडणूक होत आहे. यावेळी विक्रमी असे २३७३ अर्ज दाखल झाले आहेत. ...
तालुक्यातील ९४ गावांतील ३०९ प्रभागांतील ८१३ सदस्यांसाठी ही निवडणूक होत आहे. यावेळी विक्रमी असे २३७३ अर्ज दाखल झाले आहेत. छाननीमध्ये ३३ अर्ज अवैध ठरल्याने २३४० अर्ज शिल्लक राहिले. सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे उमेदवारांची मनधरणी करून त्यांना अर्ज काढून घेण्यासाठी पॅनेलप्रमुखांना कसरत करावी लागत होती.
एका जागेसाठी लागली निवडणूक
दडशिंगे, बळेवाडी व सावरगावात केवळ एका जागेसाठीच निवडणूक लागली आहे. सावरगावमध्ये ७ जागांपैकी ५ जागा या बिनविरोध झाल्या.
धोत्रे ग्रामपंचायत झाली माजी सैनिकांची
तालुक्यातील धोत्रे गावची निवडणूक बिनविरोध झाली आहे. नऊ सदस्य असलेल्या गावात गावकऱ्यांनी एकत्र येत गावातील सर्व माजी सैनिक व त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही ग्रामपंचायत माजी सैनिकांची ग्रामपंचायत झाली आहे.