कोरोनामुक्त गावातील १७ शाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:16 AM2021-07-16T04:16:40+5:302021-07-16T04:16:40+5:30
कोरोनामुळे अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या आपल्या वर्गाकडे पाहत विद्यार्थी भावूक झाले. वर्गशिक्षकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शाळेची मैदाने प्रार्थनेच्या ...
कोरोनामुळे अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या आपल्या वर्गाकडे पाहत विद्यार्थी भावूक झाले. वर्गशिक्षकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शाळेची मैदाने प्रार्थनेच्या निमित्ताने गुरुवारी सकाळी फुललेली दिसून आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये फिजिकल डिस्टन्स ठेवण्यात आले.
माढा तालुक्यात एकूण ७२ गावे हे कोरोनामुक्त झाल्याचा आरोग्य विभागाने वरिष्ठांना अहवाल पाठविला आहे. परंतु १५ जुलै रोजी सुरू करण्यात आलेल्या शाळा पूर्णतः कोरोनामुक्त झालेल्या गावातील आहेत. त्यामुळे जसजसा कोरोना हद्दपार होईल तसतशा शाळा तालुक्यातील विविध गावांनी सुरू करण्यात येतील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
गुरुवारी केवड, अंजनगाव उमाटे,वडाचीवाडी(उ.बु), ढवळस, दहिवली, केवड,जामगाव, पिंपळखुटे, जामगाव, विठ्ठलवाडी, बारलोणी, वेताळवाडी, भोगेवाडी, शिराळ, गवळेवाडी, मिटकलवाडी, गारअकोले येथील शाळा सुरू करण्यात आल्या. या गावात महिन्यापासून एकही कोरोना बाधित रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे तेथील कोरोना समितीने आठवीवरील सर्व शाळा वर्ग करण्यास शिक्षण विभागाला परवानगी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासून आपल्या शाळेपासून कोसो दूर असलेले विद्यार्थी वर्गात बसल्यानंतर भावूक झाल्याचे दिसून आले. खूप दिवसांनंतर आपल्या वर्गात वर्गमित्रांना भेटल्याने मात्र त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. माढा तालुक्यातील या १७ शाळांचा आढावा गटशिक्षणाधिकारी मारुती फडके व शिक्षण विस्ताराधिकारी बंडू शिंदे यांनी दिवसभर पंचायत समितीच्या कार्यालयातून घेतला. त्याचा अहवाल त्यांनी जिल्हा परिषदेला पाठविला आहे.
-----
१५कुर्डूवाडी-स्कूल
माढा तालुक्यातील वडाचीवाडी(उ बू) येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची मैदानावर गुरुवारी फिजिकल डिस्टन्स ठेवून प्रार्थना घेण्यात आली.
.....................
150721\img-20210715-wa0245.jpg
वडाचीवाडी शाळा फोटो