सोलापूर मंडलातील १७६३ फुकट्या प्रवाशांना सव्वासहा लाखांचा दंड
By appasaheb.patil | Published: November 1, 2018 01:00 PM2018-11-01T13:00:58+5:302018-11-01T13:09:05+5:30
विशेष अभियान : सोलापूर मध्य रेल्वे विभागाची कारवाई; यापुढेही मोहीम सुरूच राहणार
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : मध्य रेल्वेसोलापूर विभागांतर्गत रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाºया रेल्वे प्रवाशांविरुद्ध विशेष अभियानांतर्गत १ हजार ७६३ प्रवाशांकडून ६ लाख १४ हजार ९१७ रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सोलापूर रेल्वे विभागाचे मंडल वाणिज्य प्रबंधक सुरेशचंद्र जैन यांच्या नेतृत्वाखाली, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक राजेंद्रकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली, मुख्य तिकीट निरीक्षक झाकीर अत्तार यांच्या पथकाने ही मोहीम राबविली. सोलापूर विभागातून धावणाºया मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर गाड्यांमधील विनातिकीट प्रवास करणारे, अनियमित प्रवास करणारे, विनाबुक करून सामान, लगेज घेऊन जाणाºयांवर कारवाई केली़ या कारवाईमुळे विनातिकीट प्रवास करणाºया या रेल्वे प्रवाशांवर त्याचा परिणाम झाल्यामुळे मोहीम चालू असताना तिकीट घेऊन प्रवास करणाºया रेल्वे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे़ काही दिवसांपासून रेल्वे विभागाकडून विविध प्रकारच्या कारवाई करण्यात येत असल्याचेही रेल्वे विभागाने सांगितले़.
२२ तपासणी कर्मचाºयांनी केली कारवाई
सोलापूर मंडलात विनातिकीट प्रवास करणाºया प्रवाशांविरुद्ध वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक राजेंद्रकुमार शर्मा व मंडल वाणिज्य प्रबंधक सुरेशचंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली़ यात मुख्य तिकीट निरीक्षक झाकीर अत्तार यांच्यासह २२ तिकीट तपासणी कर्मचाºयांनी ही मोहीम पार पाडली़ सोलापूर विभागातून जाणाºया १२ मेल/एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्यांमधून प्रवास करणाºयांवर कारवाई करण्यात आल्याचे वाणिज्य प्रबंधक सुरेशचंद्र जैन यांनी सांगितले़
कोणत्याही प्रवाशांनी रेल्वेतून प्रवास करताना विनातिकीट प्रवास करू नये़ सोलापूर रेल्वे विभागाकडून विनातिकीट प्रवास करणाºयांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे़ एका महिन्यात १७६३ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे़ यापुढेही कारवाई सुरूच असणार आहे.
- राजेंद्रकुमार शर्मा,
वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक,
सोलापूर मध्य रेल्वे