माळीनगर आरोग्य उपकेंद्राचा लसीकरणाचा १७८०चा टप्पा पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:21 AM2021-04-16T04:21:34+5:302021-04-16T04:21:34+5:30

वाढत्या कोरोना रुग्णामुळे सर्व व्यवस्था कोलमडली असून, नागरिकांनी सतर्क रहाणे गरजेचे आहे. माळीनगर उपकेंद्रांतर्गत ५२ आशासेविका, तीन गटप्रवर्तक, ...

1780 phase of vaccination of Malinagar health sub-center completed | माळीनगर आरोग्य उपकेंद्राचा लसीकरणाचा १७८०चा टप्पा पूर्ण

माळीनगर आरोग्य उपकेंद्राचा लसीकरणाचा १७८०चा टप्पा पूर्ण

Next

वाढत्या कोरोना रुग्णामुळे सर्व व्यवस्था कोलमडली असून, नागरिकांनी सतर्क रहाणे गरजेचे आहे. माळीनगर उपकेंद्रांतर्गत ५२ आशासेविका, तीन गटप्रवर्तक, तीन वैद्यकीय अधिकारी, दोन आरोग्य सहाय्यक, एक आरोग्यसेविका सहा सेवक अशी टीम आहे. आशासेविका यांच्या माध्यमातून वेळोवेळी सर्व्हे करून घेतले जाते, थर्मल टेस्टिंग करून संशयिताना लक्षण चाचणी करण्यास घेऊन येणे, होम आयसोलेशनमध्ये ठेवणे, कोरोना रुग्णाचा ४८ तासांत शोध घेऊन पुढील कार्यवाहीसाठी आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधणे ही कामे दररोज चालू आहेत.

संशयित रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. अकलूज, माळेवाडी, संग्रामनगर, माळीनगर आदी गावांतील कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्याठिकाणी जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचे डाॅ. जाधव यांनी सांगितले.

चौकट

१२ एप्रिल अखेर माळीनगर उपकेंद्र अंतर्गत १७८४ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १५१२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. २०७ रुग्ण उपचार घेत आहेत. ५६ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे तसेच आत्तापर्यंत माळीनगर आरोग्य उपकेंद्रांचा लसीकरणाचा १७८० टप्पा पूर्ण झाला आहे, असे डाॅ. संकल्प जाधव यांनी सांगितले.

----

Web Title: 1780 phase of vaccination of Malinagar health sub-center completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.