जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून माळशिरससाठी १८ वर्गखोल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:27 AM2021-04-30T04:27:39+5:302021-04-30T04:27:39+5:30

माळशिरस : तालुक्यात अनेक जिल्हा परिषद शाळेच्या अपुऱ्या खोल्या अथवा कालबाह्य खोल्या असल्याने विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्गखोल्यांबाबत वारंवार मागणी ...

18 classrooms for Malshiras from the funds of District Planning Committee | जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून माळशिरससाठी १८ वर्गखोल्या

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून माळशिरससाठी १८ वर्गखोल्या

googlenewsNext

माळशिरस : तालुक्यात अनेक जिल्हा परिषद शाळेच्या अपुऱ्या खोल्या अथवा कालबाह्य खोल्या असल्याने विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्गखोल्यांबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा वार्षिक योजनांतून तालुक्यासाठी १८ वर्गखोल्या मंजूर झाल्याची माहिती सभापती शोभा साठे व माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.

तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळा वर्गखोल्यांसाठी वारंवार मागणी होती. यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक वेळा पत्रव्यवहार झाला. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १८ खोल्यांना मंजुरी मिळाली. अद्याप आणखी काही वर्गखोल्यांची मंजुरी प्रतीक्षेत असल्याची माहिती सभापती शोभा साठे यांनी दिली.

--

या गावातील शाळांच्या होणार १८ खोल्या

मळोली १ खोली, संगम १ सदाशिवनगर (पंचशील नगर), पिलीव १, जरगवस्ती १, तांबवे १, तिरवंडी १, चाकोरे १ प्रत्येक गावासाठी प्रत्येकी ८ लाख १३ हजार रुपये तर नेवरे २ खोल्या, जांभूड २, निमगाव (बनगुळे ) वस्ती २, जाधववाडी २, पुरंदावडे २ प्रत्येक गावासाठी १५ लाख ८ हजार रुपये प्रत्येकी असा एकूण १८ खोल्यांसाठी १ कोटी ४० लाख ४४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

Web Title: 18 classrooms for Malshiras from the funds of District Planning Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.