सांगोल्यात १८ कोटी ३७ लाखांची वीज थकबाकी वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:19 AM2021-04-03T04:19:06+5:302021-04-03T04:19:06+5:30

सांगोला : आर्थिक संकटात असलेल्या महावितरण कंपनीने गेल्या महिनाभरात सांगोला तालुक्यातील शेतीपंप, घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक या चारही वर्गातील ...

18 crore 37 lakh electricity arrears recovered in Sangola | सांगोल्यात १८ कोटी ३७ लाखांची वीज थकबाकी वसूल

सांगोल्यात १८ कोटी ३७ लाखांची वीज थकबाकी वसूल

Next

सांगोला : आर्थिक संकटात असलेल्या महावितरण कंपनीने गेल्या महिनाभरात सांगोला तालुक्यातील शेतीपंप, घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक या चारही वर्गातील ४४ हजार ७९९ ग्राहकांकडून थकबाकी वसूल केली आहे. या ग्राहकांकडून जवळपास १८ कोटी ३७ लाख ३७ हजार रुपयांची थकबाकी भरली आहे. मात्र, याच वर्गवारीतील २१ हजार ७१६ ग्राहकांकडे ४०४ कोटी ६२ लाख ६३ हजार रुपयांची थकबाकी प्रलंबित असल्याने नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई राहणार असल्याची माहिती महावितरणचे उपकार्यकारी अभियंता आनंद पवार यांनी दिली.

१५ फेब्रुवारीपर्यंत सांगोला तालुक्यात ३३ हजार १६९ घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक थकबाकीदारांकडे १५ कोटी रुपयांची थकबाकी होती. सोलापूर जिल्ह्यात शेतीपंपाचे सर्वाधिक ३ हजार ३५० ट्रान्स्फॉर्मर एकट्या सांगोला तालुक्यात आहेत. ३३ हजार ८८६ ग्राहकांकडे शेतीपंपाची सर्वाधिक ४१० कोटींची थकबाकीही आहे. या थकबाकीसाठी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष वीजग्राहकांशी संवाद साधत आहेत. यासाठी वीज बिल भरणा केंद्र मार्च महिन्यातील सर्व सार्वजनिक सुटीच्या दिवशी सुरू होते.

दरम्यान, महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत मार्च महिन्यात सांगोल्यातील घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक २६ हजार ३९२ थकबाकीदारांनी ६ कोटी ४५ लाख ७२ हजार रुपयांच्या थकीत वीज बिलांचा भरणा केला आहे. शेतीपंपाच्या ३३ हजार ८८६ थकबाकीदारांनी ११ कोटी ९१ लाख ६५ हजार रुपये थकबाकी भरणा केली आहे.

--

शेतीपंपाची अद्यापही ३९८ कोटी थकबाकी

सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांकडे अद्यापही शेतीपंपाची सुमारे ३९८कोटी ८ लाख ३५ हजार रुपये तर घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक अशा ६ हजार २३७ ग्राहकांकडे ६ कोटी ५४ लाख २८ हजार रुपयांची थकबाकी आहे.

Web Title: 18 crore 37 lakh electricity arrears recovered in Sangola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.