१८ रस्ते, पुलांच्या दुरूस्तीसाठी साडेतीन कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:22 AM2021-05-19T04:22:27+5:302021-05-19T04:22:27+5:30

गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्यात सांगोला विधानसभा मतदार संघांतर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांची व त्यावरील पुलांची दुरावस्था झाली होती. यासंदर्भातील अनेक ...

18 crore sanctioned for repair of 18 roads and bridges | १८ रस्ते, पुलांच्या दुरूस्तीसाठी साडेतीन कोटी मंजूर

१८ रस्ते, पुलांच्या दुरूस्तीसाठी साडेतीन कोटी मंजूर

Next

गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्यात सांगोला विधानसभा मतदार संघांतर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांची व त्यावरील पुलांची दुरावस्था झाली होती. यासंदर्भातील अनेक तक्रारी आ. शहाजीबापू पाटील यांना प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये तांदूळवाडी तालुका हद्द ते महिम शिरगिरेवस्ती ते महूदरस्ता (३० लाख), गार्डी तालुका हद्द महिम ते फळवणी रस्ता (३३ लाख), प्रजिमा ८४ ते साळुंखेवस्ती कुंभारवस्ती रस्ता (१० लाख), कोळा ते सरगरवाडी रस्ता ते इराचीवाडी चोपडी रस्ता (३५ लाख), वाकी शिवणे सिद्धवस्ती व मोरी सुधारणा (१० लाख), चिकमहूद मोरेवस्ती बंडगर वाडी कदमवाडी रस्ता (३० लाख) दुरुस्ती करणे.

महूद ते गार्डी रस्ता पूल दुरुस्ती (४३ लाख), वाकी शिवणे काटकर वस्ती जुगदर वस्ती अचकदाणी शिव रस्ते (१५ लाख), रा. मा. १२४ ते महूद ते ठोंबरे वस्ती येडगे वस्ती रस्ता (३८ लाख), वाकी शिवणे गळवेवाडी रस्ता (३५ लाख), नाझरे ते बलवडी रस्ता (१४ लाख), हतीद ते बुध्याळ रस्ता (१० लाख), कोळा ते बानूरगड रस्ता (१० लाख), कोळा ते तिपेहळी रस्ता घोरपडी ते जिल्हा हद्द रस्ता (१० लाख), मोरेवाडी रस्ता व मोरी सुधारणा (१० लाख), भाळवणी गटातील गार्डी ते मोरेवस्ती रस्ता (५ लाख), भाळवणी ते चव्हाण वस्ती रस्ता (५ लाख), भंडीशेगाव-धोंडेवाडी रस्ता आदी कामे जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून निविदा काढून पूर्ण केली जातील, असे आ. शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

Web Title: 18 crore sanctioned for repair of 18 roads and bridges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.