भालके, आवताडेंसह १९ जण रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:22 AM2021-04-04T04:22:43+5:302021-04-04T04:22:43+5:30

पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी छाननीत एकूण ३० उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले होते. शनिवारी ११ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामध्ये ...

19 people including Bhalke and Avtade in the arena | भालके, आवताडेंसह १९ जण रिंगणात

भालके, आवताडेंसह १९ जण रिंगणात

Next

पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी छाननीत एकूण ३० उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले होते. शनिवारी ११ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामध्ये महेंद्र काशीनाथ जाधव (पीपल्स रिपब्लिकन पार्टी), नागेश अण्णासो भोसले (अपक्ष), मोहन नागनाथ हळणवर (अपक्ष), इलियास हाजी युसूफ शेख (अपक्ष), संजय चरणू पाटील (अपक्ष), अमोल अभिमन्यू माने (अपक्ष), रामचंद्र नागनाथ सलगर (अपक्ष), मनोज गोविंदराव पुजारी (अपक्ष), बापू दादा मेटकरी (अपक्ष), अशोक ज्ञानदेव वाघमोडे (अपक्ष), रज्जाक ऊर्फ अब्दुलरोफ जाफर मुलाणी (अपक्ष) या उमेदवारांचा सहभाग आहे.

यामुळे पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी भगीरथ भारत भालके (कॉंग्रेस), समाधान महादेव आवताडे (भाजप), शैला धनंजय गोडसे (बहुजन विकास आघाडी), सचिन अरुण शिंदे (स्वाभिमानी), संजय नागनाथ माने (महाराष्ट्र विकास आघाडी), राजाराम कोडिंबा भोसले (बळीराजा पार्टी), सिद्धेश्वर भारत आवारे (बहुजन महापार्टी), बिराप्पा मधुकर मोटे (वंचित बहुजन आघाडी) तसेच अपक्ष म्हणून संतोष महादेव माने, संदीप जनार्दन खरात, नागेश प्रकाश पवार, अभिजित वामनराव आवाडे-बिचकुले, सुनील सुरेश गोरे, सीताराम मारुती सोनवले, सिद्धेश्वर बबन आवताडे, सुदर्शन रायचंद खंदारे, कपिलदेव शंकर कोळी, सुदर्शन पांडुरंग मसुरे, बिरुदेव सुखदेव पापरे हे १९ उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी यावेळी दिली.

Web Title: 19 people including Bhalke and Avtade in the arena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.