महावितरणच्या अभय योजनेचा २ लाख ४० हजार वीजग्राहकांना होणार लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 03:49 PM2017-10-14T15:49:38+5:302017-10-14T15:51:19+5:30
कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या घरगुती व कृषी ग्राहकांसाठी महावितरणने नवीन अभय योजना जाहीर केली आहे. यात ग्राहकाला थकबाकीची रक्कम पाच हप्त्यात भरण्याची सवलत राहणार आहे. तसेच थकीत रकमेवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १४ : कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या घरगुती व कृषी ग्राहकांसाठी महावितरणने नवीन अभय योजना जाहीर केली आहे. यात ग्राहकाला थकबाकीची रक्कम पाच हप्त्यात भरण्याची सवलत राहणार आहे. तसेच थकीत रकमेवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार आहे. बारामती परिमंडलात २ लाख ४० हजारांहून अधिक वीजग्राहकांना या योजनेचा लाभ होणार आहे.
महावितरणच्या ज्या घरगुती व कृषी ग्राहकांचा वीजपुरवठा ३१ मार्च २०१७ पूर्वी कायमस्वरूपी खंडित करण्यात आलेला आहे, अशा ग्राहकांसाठी ही नवीन योजना आहे. योजनेत सहभागी होणाºया ग्राहकांच्या मूळ थकीत रकमेची पाच हप्त्यात विभागणी करण्यात येणार आहे. त्यापैकी मूळ थकीत रकमेचा पहिला हप्ता व वीज जोडणीसाठी आवश्यक असणारी रक्कम भरल्यानंतर ग्राहकाचा वीजपुरवठा सुरू करण्यात येईल. उर्वरित मूळ थकबाकीच्या ४ हप्त्यांचा भरणा ग्राहकाने त्याला येणाºया मासिक वीज बिलासोबत करणे आवश्यक आहे. ग्राहकांनी थकीत रकमेचा पूर्ण भरणा निर्धारित पाच हप्त्यात पूर्ण केला तरच संबंधित ग्राहकाला थकीत रकमेवर व्याज व विलंब आकारात १०० टक्के माफी मिळणार आहे.
बारामती परिमंडलात ३१ मार्च २०१७ पूर्वी कायमस्वरूपी खंडित करण्यात आलेल्या २ लाख ६ हजार ५९१ ग्राहकांना या योजनेत सहभागी होता येईल. त्यांच्याकडे ८५ कोटी ८६ लाखांची मूळ थकबाकी आहे. ही थकबाकी रक्कम भरल्यास त्यांच्याकडील व्याज व विलंब आकाराचे १२ कोटी ७५ लाख रुपये माफ केले जाणार आहेत.
दोन्ही वर्गवारीत मिळून २ लाख ४० हजार १३० ग्राहकांकडे १६४ कोटी ९६ लाख रुपये मूळ थकबाकी तसेच व्याज व विलंब आकाराचे ६४ कोटी ८० लाख रुपये थकलेले आहेत. यातील मूळ थकबाकी भरल्यास व्याज व विलंब आकारात १०० टक्के माफी मिळणार आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या कृषी व घरगुती ग्राहकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
---------------------
५२ कोटी रूपये माफ केले जाणाऱ़़
च्कृषी वर्गवारीतील ३१ मार्च २०१७ पूर्वी कायमस्वरूपी खंडित करण्यात आलेल्या ३३ हजार ५३९ ग्राहकांना या योजनेत सहभागी होता येईल. त्यांच्याकडे ७९ कोटी १० लाखांची मूळ थकबाकी आहे. ही थकबाकी रक्कम भरल्यास त्यांच्याकडील व्याज व विलंब आकाराचे सुमारे ५२ कोटी ५ लाख रुपये माफ केले जाणार आहेत.