२ लाख ५ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:23 AM2021-01-03T04:23:02+5:302021-01-03T04:23:02+5:30
या निवडणुकीत ७२ ग्रामपंचायतीसाठी २७९ प्रभागासाठी ७७६ सदस्य संख्या आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ५० निवडणूक निर्णय अधिकारी, १,३८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती ...
या निवडणुकीत ७२ ग्रामपंचायतीसाठी २७९ प्रभागासाठी ७७६ सदस्य संख्या आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ५० निवडणूक निर्णय अधिकारी, १,३८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार विवेक साळुंखे, निवडणूक नायब तहसीलदार एस. पी. तिटकारे, महसूल सहायक एस. बी. कदम यांच्यासह इतर कर्मचारी पुढाकार घेत असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
सोमवारी होणार निवडणूक चिन्हांचे वाटप
तालुक्यातील ७२ ग्रामपंचायती निवडणुकीसाठी ३,३३३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीत ३३ अर्ज अपात्र झाले आहेत. ४ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत असून, त्यानंतर चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया तर १८ जानेवारीला मतमोजणी होणार असल्याचेही प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.