अक्कलकोटमध्ये दोन दिवसांत २० बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:21 AM2021-03-15T04:21:05+5:302021-03-15T04:21:05+5:30
गत तीन महिन्यांपासून शहर व तालुक्यात रुग्ण संख्येत घट झाली होती. नागरिकही याबाबत नियमांचे पालन करीत होते, मात्र फेब्रुवारीनंतर ...
गत तीन महिन्यांपासून शहर व तालुक्यात रुग्ण संख्येत घट झाली होती. नागरिकही याबाबत नियमांचे पालन करीत होते, मात्र फेब्रुवारीनंतर लग्नकार्ये, मयत, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, वास्तुशांती, यात्रा, जत्रा या ठिकाणी गर्दी वाढताना दिसत आहे. परिणामी कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे.
लसीकरणासाठी प्रतिसाद
कोरोनावर मात करण्यासाठी शहरात ग्रामीण रुग्णालय तर तालुक्यात चप्पळगाव, शिरवळ, वागदरी, मैंदर्गी, जेऊर, करजगी अशा सहा ठिकाणी कोरोना विरोधी लस देण्याचे सोय केली आहे. पहिल्या टप्प्यात ३ हजार २१९ तर दुसऱ्या टप्प्यात १ हजार ३२ नागरिकांनी लस घेतली. तसेच ज्येष्ठ नागरिक, ४५ ते ५९ वयोगटातील बीपी, शुगर, कॅन्सर या सारख्या रुग्णांना प्राधान्य देण्यात येत आहे.
या ठिकाणी आढळले नव्याने रुग्ण
मागील दोन दिवसांत शहरात बागवान गल्ली, आझाद गल्ली, सेंट्रल चौक, नवीन तहसील परिसर, ग्रामीण भागात चपळगाव, तडवळ, समर्थनगर, नागणसूर, जेऊरवाडी, सिंदखेड या गावात एकूण २० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत.
फोटो
१४अक्कलकोट०१
ओळी
रिक्षातून प्रवास करताना फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडल्याचे दिसून येत आहे.