सहा गावचे २० सदस्य बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:18 AM2021-01-02T04:18:41+5:302021-01-02T04:18:41+5:30

उत्तर सोलापूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तालुक्यातून ७५२ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. त्याची ...

20 members from six villages unopposed | सहा गावचे २० सदस्य बिनविरोध

सहा गावचे २० सदस्य बिनविरोध

Next

उत्तर सोलापूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तालुक्यातून ७५२ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. त्याची छाननी गुरुवारी झाली. यामध्ये एका जागेसाठी एकच अर्ज दाखल झाल्याने व दाखल झालेल्या अर्जापैकी काही अर्ज अपात्र ठरल्याने २० सदस्य अविरोध निवडून आले आहेत. मात्र याची रितसर घोषणा सोमवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर होणार आहे.

पडसाळी ग्रामपंचायतीसाठी अजित शिरसट, स्वाती समाधान भोसले, तबस्सुम मियासाहेब शेख, रेणुका माळी व माणिक माळी हे बिनविरोध निवडून आले. उर्वरित चारही सदस्य बिनविरोध होण्यासाठी गावक-यांचे एकमत झाले आहे. साखरेवाडीत हिराबाई भागवत सुतार, सीमा मल्हारी कांबळे, राधा महांकाळेश्वर ताटे, माधुरी संतोष क्षीरसागर, राळेरास ग्रामपंचायतीसाठी नागनाथ माने, रूपाली सोमनाथ राशिनकर, स्वाती नागनाथ नागोडे, स्वप्ना अनिल जाधव, केशर बाजीराव कांबळे, पाथरी येथील श्रीमंत बंडगर, पंकज उत्तम मसलखांब, वडाळा येथील सोनल सुरेंद्र कांबळे, तरटगाव येथील बायडाबाई रमेश कसबे, जयश्री सिद्धेश्वर पारडे, भागाईवाडीत एका जागेसाठी छाया शिवाजी जाधव हे बिनविरोध निवडून आले आहेत.

----बिनविरोधसाठी जुने सवंगडी एकत्रपडसाळी, राळेरास साखरेवाडी व पाथरी या ग्रामपंचायती बिनविरोध होण्यासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. हिरज, कोंडी व नान्नज या ग्रामपंचायती बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकमेकात राजकीय अंतर वाढल्याने वाढणारा संघर्ष थांबविण्यासाठी पाथरीत जुने सवंगडी एकत्रित आल्याने निवडणूक बिनविरोध होत आहे.

----

Web Title: 20 members from six villages unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.