थकीत बिलातील २० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:28 AM2021-08-25T04:28:11+5:302021-08-25T04:28:11+5:30
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागासह सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारा कारखाना म्हणून सदाशिवनगरच्या श्री शंकर ...
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागासह सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारा कारखाना म्हणून सदाशिवनगरच्या श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. मध्यंतरीच्या काळात हा कारखाना बंद होता; परंतु माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या सभासदांनी मोठ्या विश्वासाने हा कारखाना आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाच्या हाती दिला. सन २०२१- २२ च्या गळीत हंगामासाठी सुमारे ७ हजार ५०० एकर उसाची नोंद झाली आहे. कारखान्याने ४ लाख मे.टन उस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
..........
४ हजार सभासदांना लाभ
२०१५ - १६ हंगामात ऊस गाळप करून कारखाना बंद पडला. त्यामुळे ऊस उत्पादक, कामगार, व्यापाऱ्यांचे पैसे अडकले. आंदोलने करूनही पैसे मिळाले नव्हते. अखेर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले. कारखान्याच्या ४ हजार ३०० उस उत्पादक सभासद व बिगर सभासदांच्या २६ कोटी रकमेपैकी २० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले. एकूणच अनेक वर्षे अडकलेले बुडीत जमा धरलेले पैसे मिळाल्यामुळे बागायतदारांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.