मळणी करण्यासाठी ठेवलेली २० क्विंटल तूर जाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:19 AM2021-01-04T04:19:55+5:302021-01-04T04:19:55+5:30

पोथरे येथील कमल काळे यांची खरीप हंगामात अडीच एकर क्षेत्रात पिकलेली २० क्विंटल तूर कापणी करण्यासाठी एकत्रित जमा केली ...

20 quintals of tar kept for threshing was burnt | मळणी करण्यासाठी ठेवलेली २० क्विंटल तूर जाळली

मळणी करण्यासाठी ठेवलेली २० क्विंटल तूर जाळली

Next

पोथरे येथील कमल काळे यांची खरीप हंगामात अडीच एकर क्षेत्रात पिकलेली २० क्विंटल तूर कापणी करण्यासाठी एकत्रित जमा केली होती. त्याची रात्री राखणीसाठी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात व्यक्तीने पेटवून दिले. त्यामुळे संपूर्ण तूर जळून भस्मसात झाली. सकाळी शेतात आल्यानंतर कल्याण पाटील यांना तूर जळालेल्या अवस्थेत दिसून आली. या प्रकरणी पोलीस पाटील यांनी कामगार तलाठी व पोलिसांना कळविल्यानंतर तलाठी मयूर क्षीरसागर, रवींद्र जाधव यांनी पंचनामा केला. अडीच एकर क्षेत्रातील २० क्विंटल तुरीचे १ लाख २० हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसात गोपीनाथ पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

कोट घेणे..

यंदा जोरदार पाऊस झाल्याने तूर जोमदार आली. हातातोंडाशी आलेल्या तुरीचा घास अज्ञात दृष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तीने जाळून नुकसान केल्याने मनाला वेदना होतात. त्या व्यक्तींचा पोलिसांनी शोध घ्यावा व कठोर कारवाई करावी.

- गोपीनाथ पाटील,

शेतकरी पोथरे

फोटो

०३करमाळा-तूर

फोटो ओळी : पोथरे ता.करमाळा येथे कमल पाटील यांच्या शेतातील खळ्यात मळणीसाठी ठेवलेली तूर जळून खाक झाल्याचे दिसत आहे.

Web Title: 20 quintals of tar kept for threshing was burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.