२० हजार ५७९ मेट्रिक टन खते उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:18 AM2021-05-29T04:18:00+5:302021-05-29T04:18:00+5:30
चालू खरीप हंगामात मान्सून व पिकांच्या अपेक्षित पेरणी क्षेत्राचा विचार करता सांगोला कृषी विभागातर्फे सांगोला शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ...
चालू खरीप हंगामात मान्सून व पिकांच्या अपेक्षित पेरणी क्षेत्राचा विचार करता सांगोला कृषी विभागातर्फे सांगोला शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वाढीव रासायनिक खते मंजूर आहेत. तालुकास्तरावर कृषी विभागातर्फे रासायनिक खताचे योग्य नियोजन केले आहे. खताची टंचाई निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. महाबीज कंपनीकडून सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी केंद्रातून मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे.
खरिपासाठी उपलब्ध खते
सांगोला तालुक्यात चालू खरीप हंगामासाठी युरिया ८९५२, डीएपी ३११५, एसएसपी २२६१, एमओपी १८९६, एनपीके ४३५५ अशी एकूण सुमारे २० हजार ५७९ मेट्रिक टन रासायनिक खते उपलब्ध केली आहेत, तर चालू खरीप हंगामात बाजरी २२ हजार, मका सात हजार, तूर ५००, उडीद ४००, मूग २५०, भुईमूग ५००, सूर्यफूल ५००, इतर कडधान्य २५० अशा ३१ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे.
कोट ::
शहर व तालुक्यात २० मेपासून युरियावगळता इतर रासायनिक खतांचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे कमी झालेल्या दरानुसार रासायनिक खतांच्या विक्रीचे आदेश विक्रेत्यांना दिले आहेत. याउपर जर कोणी विक्रेता जादा दराने खतविक्री करत असल्याचे निदर्शनास आल्यास शेतकऱ्यांनी तालुका नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. संबंधित खत विक्रेत्या दुकानदारावर कारवाई करण्यात येईल.
- दीपाली जाधव,
तालुका कृषी अधिकारी, सांगोला