बार्शीत दिवसभरात २०३ नवे बाधित रुग्ण, दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:27 AM2021-04-30T04:27:50+5:302021-04-30T04:27:50+5:30

यामध्ये बार्शी शहरात ६८ तर ग्रामीण भागात १३५ रुग्ण आहेत, अशी माहिती तालुका प्रभारी वैद्यकीय अधिकारी ...

203 newly infected patients, both died in a rainy day | बार्शीत दिवसभरात २०३ नवे बाधित रुग्ण, दोघांचा मृत्यू

बार्शीत दिवसभरात २०३ नवे बाधित रुग्ण, दोघांचा मृत्यू

Next

यामध्ये बार्शी शहरात ६८ तर ग्रामीण भागात १३५ रुग्ण आहेत, अशी माहिती तालुका प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ढगे यांनी दिली.

एका दिवसात २२३७ जणांच्या रॅपिड व आरटीपीसीआर चाचण्या केल्या आहेत.

शहरात ८४९ तर ग्रामीण भागात १३८८ चाचण्या करण्यात आल्या. ११६ जण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. बार्शीत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट रुग्णांची संख्या ही जास्त आहे. त्यामुळे ऑक्सिजन सिलिंडर आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरात शिवाजी नगर, पंकज नगर, अलीपूर रोड या भागात तर ग्रामीण भागातील वैरागमध्ये १४, नांदणी ६, बोरगाव झाडी ११, कोरेगाव २०, धामणगाव व सुर्डी ७ या गावांत जास्त रुग्ण आढळून आले आहेत.

Web Title: 203 newly infected patients, both died in a rainy day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.