बार्शी तालुक्यात दोन दिवसांत २१२ नवे रुग्ण; ८ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:23 AM2021-05-20T04:23:30+5:302021-05-20T04:23:30+5:30
शहर व तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ ही थांबण्यास तयार नाही. रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येण्याची टक्केवारीही जास्त आहे. शहरातील ...
शहर व तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ ही थांबण्यास तयार नाही. रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येण्याची टक्केवारीही जास्त आहे. शहरातील रुग्णसंख्या कमी होत असली तरी ग्रामीण भागात रुग्णांसोबतच मृत्यूची संख्यादेखील वाढतच आहे.
या दोन दिवसांत २०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर दुसरीकडे ८ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण २१२ रुग्णांमध्ये बार्शी शहरात ३५ तर ग्रामीण भागातील १७७ रुग्ण आहेत, अशी माहिती तालुका प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ढगे यांनी दिली. दोन दिवसांत १७८६ जणांच्या रॅपिड व आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरात ९०७ तर ग्रामीण भागात ८८९ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. बार्शीत हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांची संख्या ही जास्त आहे.
----