२१६० जागा अतिरिक्त; सर्व विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

By admin | Published: June 18, 2014 01:03 AM2014-06-18T01:03:38+5:302014-06-18T01:03:38+5:30

प्रवेश क्षमता ५५,५२० : उत्तीर्ण झाले ५२ हजार ८५४

2160 additional seats; All students will get admission | २१६० जागा अतिरिक्त; सर्व विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

२१६० जागा अतिरिक्त; सर्व विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

Next


सोलापूर : इयत्ता दहावी परीक्षेत सोलापूर जिल्ह्यात ५२ हजार ८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या सर्व विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण जिल्ह्यातील ३४४ कनिष्ठ महाविद्यालयांतील एकूण प्रवेश क्षमता ५५ हजार ५२० इतकी आहे.
मार्च २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल ७५.२४ टक्के इतका लागला होता. यंदा मात्र यामध्ये १४.१३ टक्क्यांनी वाढ होऊन हा निकाल ८९.३७ टक्क्यांवर गेला आहे.
सोलापूर शहरात अनुदानित व विनाअनुदानित कला शाखेच्या ६४ तुकड्या असून प्रवेश क्षमता ५६४० इतकी आहे. विज्ञान शाखेच्या ५० तुकड्या असून तिची प्रवेश क्षमता ४४८० आहे. वाणिज्य शाखेच्या ३६ तुकड्या असून प्रवेश क्षमता ३३२० इतकी आहे. संयुक्त शाखेच्या ५ तुकड्या असून प्रवेश क्षमता ४०० इतकी आहे.
सोलापूर शहरात आॅर्किड, सोनी, सेवासदन ही कनिष्ठ महाविद्यालये स्वयं अर्थसहाय्यित असून यामध्ये कला शाखेची एक तुकडी असून तिची प्रवेश क्षमता ८० आहे. विज्ञान शाखेच्या २ तुकड्या असून तिची प्रवेश क्षमता १६० इतकी आहे. वाणिज्य शाखेच्या २ तुकड्या असून तिची प्रवेश क्षमता १६० इतकी आहे.
उर्वरित जिल्ह्यातील अनुदानित व विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला शाखेच्या २६२ तुकड्या असून तिची प्रवेश क्षमता २२ हजार ४००, विज्ञान शाखेच्या १३२ तुकड्या असून तिची प्रवेश क्षमता ११ हजार ४४० आहे. वाणिज्य शाखेच्या २६ तुकड्या असून प्रवेश क्षमता २ हजार ५२० इतकी आहे. संयुक्त शाखेच्या २० तुकड्या असून तिची प्रवेश क्षमता १६०० इतकी आहे.
जिल्ह्यात स्वयं अर्थसहाय्यित कला शाखेच्या १७ तुकड्या आहेत. तिची प्रवेश क्षमता १५६० आहे. विज्ञान शाखेच्या २० तुकड्या असून प्रवेश क्षमता १६०० आहे. वाणिज्य शाखेच्या २ तुकड्या असून प्रवेश क्षमता १६० इतकी आहे.
-----------------------------
अकरावी प्रवेश वेळापत्रक
दहावी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी शिक्षणाधिकरी एल. एस. पोले यांनी वेळापत्रक जाहीर केले आहे. ते याप्रमाणे
दि. २० ते २८ जून : कॉलेजस्तरावर प्रवेश अर्ज वाटप
२४ ते २८ जून : भरलेले अर्ज संबंधित कॉलेजकडे सादर करणे
२९ जून ते २ जुलै : कॉलेजस्तरावर प्रवेश अर्जांची छाननी
३ जुलै : पहिली गुणवत्ता यादी
३ ते ५ जुलै : पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश
८ जुलै : दुसरी गुणवत्ता यादी
८ ते ९ जुलै : दुसऱ्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश
१० जुलै : जागा रिक्त असल्यास तिसरी गुणवत्ता यादी
१० ते १२ जुलै : तिसऱ्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश
--------------------------------------
प्रवेश सुकर
इयत्ता दहावीच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील ५२ हजार ८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग सुकर झाला असून एकूण प्रवेश क्षमता ५५ हजार ५२० इतकी आहे. कला शाखेच्या ३४४ तुकड्या असून प्रवेश क्षमता २९ हजार ६८० आहे. विज्ञान शाखेच्या २०४ तुकड्या असून प्रवेश क्षमता १७ हजार ६८० आहे. वाणिज्य शाखेच्या ६६ तुकड्या असून प्रवेश क्षमता ६ हजार १६० इतकी आहे. संयुक्त शाखेच्या २५ तुकड्या असून प्रवेश क्षमता २ हजार इतकी आहे.
-----------------------------
१९ जूनला बैठक
अकरावी प्रवेशाबाबत शहर व जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांतील प्राचार्यांची गुरुवार, दि. १९ जून रोजी दुपारी १२ वाजता जुनी मिल कंपाउंड येथील नागेश करजगी आॅर्किड स्कूल येथे बैठक बोलाविण्यात आली आहे. यावेळी अकरावी प्रवेशाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. १२ जुलैपर्यंत अकरावी प्रवेश प्रक्रिया चालणार असून कॉॅलेजचे नियमित वर्ग १४ जुलैपासून सुरु करण्यात येणार असल्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एल. एस. पोले यांनी सांगितले.

Web Title: 2160 additional seats; All students will get admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.