कत्तलखान्याकडे नेताना जप्त केलेल्या २२ बैलांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:21 AM2021-05-22T04:21:23+5:302021-05-22T04:21:23+5:30
ताबा देण्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला बार्शी : कत्तलखान्याकडे नेण्यात येणारी जनावरे पकडल्याने त्यांची सुरक्षितता व आरोग्यासंबंधी कोणतीच ...
ताबा देण्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
बार्शी : कत्तलखान्याकडे नेण्यात येणारी जनावरे पकडल्याने त्यांची सुरक्षितता व आरोग्यासंबंधी कोणतीच तडजोड करता येणार नसल्याने, अर्जदारांच्या मागणीनुसार त्यांना त्यांच्याकडे दिल्यास त्यांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होणार असल्याने बार्शी न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सबनीस यांनी ताबा मागणारा शिवाजी काळे यांचा अर्ज फेटाळून लावला.
२७ मार्च रोजी तालुका पोलिसांच्या हद्दीतून दोन वाहनांतून २२ जनावरे कत्तलखान्याकडे नेली जात असल्याची माहिती मानद पशुकल्याण अधिकारी धन्यकुमार पटवा यांना समजली. त्यांनी पोलिसांना कळवून तालुका पोलीस राहुल बोंदर यांच्यासह जामगाव आ. येथील चौकात जाऊन वाहने अडविली होती. तपासणीत प्रत्येक वाहनात ११ जनावरे दाटीवाटीने बांधल्याचे व त्यांच्या खाद्याची सोय नसल्याचे दिसले. त्यामुळे पोलिसांनी तीजप्त करून त्यांचा सांभाळ करण्यासाठी नवकार जैनतीर्थ गोशाळेत पाठविली होती. त्याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली होती.
यातील जनावरे नेणारी व्यक्ती ही विक्री व्यवसाय करते. ती श्रीगोंदा येथून खरेदी करून आणली व ती आठवडे बाजारासाठी नेत असताना जप्त केली. त्यामुळे जप्त केलेल्या जनावरांचा अंतिम ताबा मिळावा, अशी मागणी त्याने न्यायालयात केली होती. त्याबाबत पटवा यांनी गोशाळेच्यावतीने अर्ज केला. त्यांच्यावतीने ॲड. शशिकांत चांडक (मुंबई) यांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे निवाडे संदर्भ देऊन खरेदीच्या पावत्या बनावट, त्यावर विक्रेत्यांच्या सह्या नाहीत. शिवाय संबंधीतावर पूर्वीचे गुन्हेही दाखल आहेत. जनावरांचा ताबा दिल्यास त्यांची कत्तल होईल. क्षमतेपेक्षा जास्त जनावरे घातली असल्याचे सांगताच न्यायालयाने अंतरिम ताबा मागणीचा अर्ज फेटाळून लावला.
यात फिर्यादीच्यावतीने ॲड. राहुल झालटे, ॲड. दिनेश श्रीश्रीमाळ यांनीही काम पाहिले.