तदानानंतर दोन गटात मारहाण<bha>;</bha> २३ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:19 AM2021-01-17T04:19:53+5:302021-01-17T04:19:53+5:30
मोहोळ : तालुक्यात शेजबाभुळगाव येथे मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर रात्री दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत ४६ जणांविरोधात ...
मोहोळ : तालुक्यात शेजबाभुळगाव येथे मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर रात्री दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत ४६ जणांविरोधात पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले. तसेच २५ दुचाकी जप्त केल्या असून याप्रकरणात रात्रीच नऊ जणांना अटक केली. त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, शनिवारी सायंकाळी आणखी १४ अटक केली असून, त्यांना रविवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार मोहोळ तालुक्यात शेजबाभुळगाव येथे शुक्रवारी सायंकाळी ग्रामपंचायत मतदानाची प्रक्रिया संपली. सांयकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान गावात दोन्ही पॅनेलच्या गटात हाणामारी झाली.
अवधूत माळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेले असता गणपत महादेव पुदे, प्रतीक पुदे ,रोहन पुदे ,तानाजी जाधव, शिवराज पाटील, अनिल पुदे ,चंद्रकांत पुदे, चैतन्य कापसे, सचिन पटने, रघुनाथ पुदे, बसवेश्वर पुदे, वैभव पाटील, तानाजी पाटील, गजेंद्र फरतडे, दत्तात्रय गजेंद्र फडतरे, सीताराम माळी, शंकर माळी, संतोष पुदे, अभिमन्यू फडतरे, हुसेन शेख या २० जणांनी अंगावर मिरचीची पूड टाकून काठीने बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे .
दुसऱ्या गटातून गणपत पुदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कार्यकर्त्यांच्या दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारला असता चारचाकी वाहनातून आलेले अवधूत रामचंद्र माळी, माधवराव आप्पासाहेब पाटील, राजाराम कुंडलिक भंडारे, लक्ष्मण बब्रुवान माळी, रामचंद्र बब्रुवान माळी, सतीश हरिदास भंडारे, नागेश राजाराम माळी, राजाराम बब्रुवान माळी, अशोक संदीपान माळी, बापू भगवान भंडारे, कृष्णात अशोक पाटील, मुन्ना बाळू भंडारे या १२ जणांनी काठ्या व मिरचीची पूड टाकून मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक सायकर व उप विभागीय अधिकारी प्रभाकर शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार डुनगे करीत आहेत.
पुरवणी जबाबात १४ जणांना अटक
दरम्यान शनिवारी घेण्यात आलेल्या पुरवणी जबाबानुसार आणखी १४ जणांना अटक केली आहे. यात बाळासाहेब पटणे, अजिंक्य पुदे, महादेव पुदे, शिवाजी पुदे, नागनाथ गायकवाड, अशोक फडतरे, नितीन पाटील, राजाराम फडतरे, गोरख भंडारे, दत्तात्रय पुदे, महेश पाटील, माणिक ओहोळ, नितीन मोरे, आम्रमाल फडतरे यांचा समावेश आहे. त्यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.