रेल्वेचा २३ दिवस ब्लॉक; दौड-निजामाबाद एक्सप्रेस अन् भुसावळ-दौंड डेमू रद्द
By Appasaheb.patil | Published: March 1, 2023 05:38 PM2023-03-01T17:38:16+5:302023-03-01T17:39:42+5:30
मध्य रेल्वे प्रशासनाची माहिती; अन्य गाड्यांच्या वेळेत केला मोठा बदल
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील बेलापूर, चितळी आणि पुंतांबा स्टेशन, दौंड- मानमाड सेक्शन दरम्यान नाॅन इंटरलॉक, दुहेरीकरण व ब्लॉक बसविण्याच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने १ ते २३ मार्च २०२३ रोजीपर्यंत ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉक कालावधीत दौंड -निजामाबाद एक्सप्रेस,निजामाबाद - पुणे एक्सप्रेस रद्द, भुसावळ-दौंड डेमू व दौंड व भुसावळ डेमू या गाड्या २३ मार्च पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेतील सोलापूर विभागाच्या बेलापुर, चितळी आणि पुंतांबा, (दौंड – मानमाड सेक्शन ) दरम्यान (नान -इंटरलॉक , दुहेरी मार्ग सुरू करण्यासंबंधी ट्राॅफिक ब्लॉक चालणार आहे. हा ब्लॉक १ मार्च ते २३ मार्च २०२३ या कालावधीपर्यंत असणार आहे. या कामासाठी चार गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या रिशेडयुल केल्या आहेत.
दरम्यान, ६, १३, २० मार्चला पुणे-जबलपूर एक्सप्रेस पुणे स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळे पेक्षा ३.५५ मिनिटे उशीरा सुटणार असून ही गाडी संध्याकाळी ३.२५ वाजता सुटणार आहे. ७. १४, २१ मार्चला पुणे - लखनऊ एक्सप्रेस पुणे स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळे पेक्षा ४.३० मिनिट उशीरा सुटणार असून ही गाडी संध्याकाळी ३.२५ वाजता सुटणार आहे. १, ५, ८, १२, १५, १९ आणि २२ मार्चला सुटणारी पुणे - हटिया एक्सप्रेस पुणे स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळे पेक्षा ४.४० मिनिट उशीरा सुटणार आहे. ही गाडी संध्याकाळी ३.२५ वाजता सुटणार आहे. याशिवाय ४, ११, १८ रोजी सुटणारी पुणे - हटिया एक्सप्रेस पुणे स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळे पेक्षा ४.४० मिनिट उशीरा सुटणार असून संध्याकाळी ३.२५ वाजता सुटणार आहे.