मंगळवेढा तालुक्यातील २३ गावांनी मिळविला कोरोनावर विजय; आरोग्य, महसूल, पोलीसांचे परिश्रम सार्थकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 11:55 AM2021-06-05T11:55:07+5:302021-06-05T11:55:30+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

23 villages in Mangalvedha taluka win over Corona; Health, revenue, police hard work worthwhile | मंगळवेढा तालुक्यातील २३ गावांनी मिळविला कोरोनावर विजय; आरोग्य, महसूल, पोलीसांचे परिश्रम सार्थकी

मंगळवेढा तालुक्यातील २३ गावांनी मिळविला कोरोनावर विजय; आरोग्य, महसूल, पोलीसांचे परिश्रम सार्थकी

googlenewsNext

मंगळवेढा - मल्लिकार्जुन देशमुखे

ब्रेक द चेन या शासनाच्या मोहिमेअंतर्गत लावण्यात आलेला कडक लॉकडाऊन, महसूल ,पोलिस प्रशासनाने कडक निर्बंधाची अंमलबजावणी, आरोग्य विभागाने वाढवलेले टेस्टिंग, ट्रेसिंग व तात्काळ केलेले उपचार , लसीकरणासाठी नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद, वाढवलेले कोव्हिडं सेंटर यामुळे कोरोनाचा आलेख झपाट्याने खाली आला आहे मंगळवेढा तालुक्यात २३ गावानी कोरोनावर विजय मिळविला   आहे ही बाब तात्पुरती तरी दिलासादायक आहे .उर्वरित ५५  गावात कमी अधिक प्रमाणात कोरोना रुग्ण असुन येथील संसर्ग आटोक्यात आला तर तालुका पूर्णपणे कोरोना मुक्त होणार आहे दरम्यान तालुक्यात आजपर्यंत ४ हजार ३६७ रुग्णापैकी ४ हजार ५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या केवळ १७२ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत आजपर्यंत कोरोनाने १३८ जणांचा बळी घेतला आहे

 १ ते ५  पेक्षा कमी रुग्ण संख्या असणारी  ५० पर्यत गावे असून या आठवड्यात या गावातून एक ही रुग्ण न आढळल्यास या गावाचे चित्र सुद्धा समाधानकारक असणार आहे असे  आरोग्य अधिकारी डॉ नंदकुमार शिंदे  यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले.

पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मृत्यू दर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नागरिकांत या डेंजर व्हायरस ची मोठी दहशत निर्माण झाली त्यामुळे नागरिकांनी लॉक डाऊन काळात घरीच राहणे पसंत केले. तरुणांच्या मृत्यूत ही कमालीची वाढ झाल्याने तरुणांसह अबाल वृद्धांनी कोरोना चाचणी करण्याकडे भर दिला त्यातूनच तातडीने उपचार करण्यात आले. गावोगावी शाळा, समाज मंदिर यामध्ये विलगिकरन करण्यात आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास मदत झाली.त्यामुळे कोरोना बाधित रुग्णाचे आकडे सध्यातरी झपाट्याने खाली आले आहेत.ही बाब सुखावह आहे . कोरोना मुक्त गावाचा आदर्श इतर गावांनी घेऊन तालुका कोरोना मुक्त करावा अशी आशा आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. सध्यस्थीतीत २३ गावांनी कोरोनावर विजय मिळविला असला तरी सध्या हळूहळू  अनलॉक होत असल्याने बाजारपेठेत गर्दी वाढत आहे.नागरिकांचा वाढता संपर्क, सार्वजनिक कार्यक्रम, लग्नसोहळे होऊ लागल्याने प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. सदर गावे कोरोनामुक्त होण्याकामी प्रांताधिकारी उदयसिंह भोसले तहसीलदार स्वप्नील रावडे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, वैद्यकीय अधिकारी डॉ नंदकुमार शिंदे, डॉ धनंजय सरोदे ,डॉ प्रमोद शिंदे ,डॉ दत्तात्रय शिंदे ,डॉक्टर संजय कांबळे, डॉ वर्षा पवार ,डॉ भीमराव पडवळे ,डॉ श्रीपाद माने  , फार्मसी ऑफीसर सी .वाय .बिराजदार ,हणमंतराव कलादगी, विस्ताराधिकारी प्रदीप भोसले तालुक्यातील सर्व आरोग्य सहाय्यक तसेच कार्यालयातील त्यांचे सर्व सहकारी यांनी मोठे परिश्रम घेतले आहे.

 या गावांनी केले कोरोनाला हद्दपार....

अरळी , तामदर्डी रहाटेवाडी, बठाण, खडकी, शिरसी, हुंनूर, मानेवाडी, रेवेवाडी, लोणार, महमदाबाद हुंनूर, पौट, मारोळी, सोडडी, भालेवाडी, फटे वाडी, खोमनाळ,जित्ती, डिकसळ, कचरेवाडी, लेंडवे चिंचाळे, हाजापुर, देगाव आदी २३ गावामध्ये आरोग्य विभागाच्या आकडेवारी नुसार कोरोना रुग्ण संख्या शून्यावर आली आहे यासह नंदुर , मुंढेवाडी  उचेठाण, मूढवी, धर्मगाव , ढवळस, सिध्दनकेरी, शिरनादगी, गोनेवाडी, जुणोनी, पडोळकरवाडी, सलगर बुद्रुक, आसबेवाडी, हुलजती, शिवनगी , येळ गी, मानेवाडी, खवे, कागष्ट , बालाजीनगर, कर्जाळ, गणेशवाडी, लक्ष्मी दहिवडी, गुंजेगाव, म्हमदाबाद शेटफळ, खुपसंगी , डोंगरगाव ,घरनिकी, मारापूर आदी २९ प्रत्येक गावामध्ये सध्या केवळ एक रुग्ण ऍक्टिव्ह आहे तर माचनूर, भोसे, नंदेश्वर, चिक्कलगी, बावची, भाळवणी, तळसंगी, जालिहाळ, कात्राळ, अंधळगाव, शेलेवाडी, चोखामेळानगर, शरदनगर, मलेवाडी, सिद्धापूर, ताडोर, आदी १६ प्रत्येक गावात केवळ दोन रुग्णसंख्या आहे तर ब्रह्मपुरी, रेड्डे, सलगर खुर्द, हिवरगाव, निबोणी, येद्राव आदी सहा गावात पाचच्या आत रुग्णसंख्या आहे उर्वरित मरवडे १२, अकोला १०, दामाजीनगर ९, अशी रुग्णसंख्या आहे तर लवंगी येथील शाळेतील ३६ पेक्षा जास्त मुले पॉझिटिव्ह आढळल्याने या गावची रुग्णसंख्या ४२ आहे 

 

  • - तालुक्यात एकूण रुग्णसंख्या ---४३६७
  •  - कोरोनामुक्त झालेले--४०५७
  • - ऍक्टिव्ह रुग्ण--१७२
  • - एकूण मृत्यू --१३८
  •  

मंगळवेढा तालुक्यातील २३ गावात सध्यस्थीतीत रुग्णसंख्या शून्यावर आहे तर २९ गावात केवळ १ ते २ रुग्णसंख्या आहे तरीही नागरिकांनी कोरोनामुक्त झाल्याच्या अविर्भावात राहू नये. गर्दीत जाणे टाळावे ,मास्कचा वापर करावा ,लक्षणे आढळल्यास तत्काळ  तपासणी करून विलीनीकरण केंद्रात अथवा दवाखान्यात जावुन उपचार घ्यावेत. सावधानता बाळगावी बेफिकीर राहू नये.

- डॉ. नंदकुमार शिंदे, आरोग्य अधिकारी, मंगळवेढा

Web Title: 23 villages in Mangalvedha taluka win over Corona; Health, revenue, police hard work worthwhile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.