तपासणीत आढळली २३ हजार बालके आजारी 'बाल सुरक्षा अभियान'; १४३ बालकांवर शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 05:30 PM2023-02-23T17:30:02+5:302023-02-23T17:30:28+5:30
सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राज्यातील ० ते १८ वर्षांपर्यंतच्या बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीत सोलापूर जिल्ह्यात २३ हजार बालके आजारी असल्याचे आढळले.
शीतलकुमार कांबळे
सोलापूर - सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राज्यातील ० ते १८ वर्षांपर्यंतच्या बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीत सोलापूर जिल्ह्यात २३ हजार बालके आजारी असल्याचे आढळले.
सोलापूर जिल्ह्यातील ० ते १८ वर्ष वयोगटातील एकूण लाभार्थी ९,७९,८०१ एवढे आहेत. २१ फेब्रुवारी अखेर ३६३३१४ मुलांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २३७५९ बालके आजारी आढळली. या पैकी १६०५३ बालकांना औषध उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी ७०९९ बालकांना स्पेशॅलिटी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. १४३ बालकांना शस्त्रक्रियासाठी पाठवण्यात येणार आहे.
४६४ पथक करताहेत तपासणी
जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या आदेशानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सोनिया बागडे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांनी ४६४ प्राथमिक तपासणी पथक तयार केलेले आहेत.