ग्रामीण भागात आढळले २४ कोरोना बाधित रुग्ण; एकूण रुग्णसंख्या झाली ६७
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 05:37 PM2020-06-04T17:37:54+5:302020-06-04T17:40:19+5:30
विडी घरकुल, बार्शी शहर, जामगाव, उक्कडगावात कोरोना घुसला; सोलापूर जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क
Next
ठळक मुद्देसोलापुरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढलीकोरोना बरोबर सारी या आजाराचेही आढळले रुग्णसोलापूर शहर पोलीस संचारबंदी काळात सतर्क
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे गुरुवारी एकूण २४ कोरोना बाधित रुग्ण आढळले. यात विडी घरकुल, बार्शी शहर, जामगाव, उक्कडगाव, कुंभारी, मुळेगाव या गावांचा समावेश आहे.
गुरुवारी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे ग्रामीण भागातील 98 अहवाल प्राप्त झाले. यातील २४ अहवाल पॉझिटिव्ह आढळले. विडी घरकुलमधील १६, उक्कडगाव १, बार्शी शहर १, जामगाव २, कुंभारी २, मुळेगाव १ अशी गावनिहाय रुग्णसंख्या आहे. आत्तापर्यंत ग्रामीण भागात एकूण ६७ कोरोना बाधित रुग्ण आढळले. यापैकी ५७ रुग्णांवर उपचार सुरू आहे आत्तापर्यंत पाच कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे.