धोत्री येथे २४ लाखाचा गुटखा पकडला, सोलापूर ग्रामीण पोलीसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 02:33 PM2018-08-28T14:33:59+5:302018-08-28T14:36:10+5:30
अवैध गुटख्याची वाहतूक करणाºया ट्रॅक वर धाड टाकून येथून २४ लाखाचा गुटखा पकडला.
सोलापूर : उपविभागीय पोलिस अधिकारी अक्कलकोट विभाग प्रीतम कुमार यावलकर यांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार धोत्री (तालुका दक्षिण सोलापूर) येथे अवैध गुटख्याची वाहतूक करणाºया ट्रॅक वर धाड टाकून येथून २४ लाखाचा गुटखा पकडला.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, ट्रक क्रमांक एम एच ४४ ९५५५ यामध्ये बेकायदेशीररीत्या गुटखा वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी प्रीतम कुमार यावलकर, सपोनि दीपक जाधव ,पोना / महादेव जाधव ,पो.का सचिन खंडागळे, श्रीकांत जमादार ,कपिल काटकर लक्ष्मण काळजे आदींनी घटनास्थळी जाऊन अवैध प्रकारचे हिरव्या रंगाचे गोवा गुटखा असेलेले एकूण २७६ पोते त्याची अंदाजीत किंमत २४ लाख रुपये इतकी आहे.
संबंधित वाहन व मुद्देमाल तात्काळ ताब्यात घेऊन अक्कलकोट येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय परिसरात लावण्यात आले़ पुढील कारवाईसाठी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन अधिकारी सोलापूर यांच्या ताब्यात दिलेला आहे़ पुढील कारवाई अन्न व औषध प्रशासन अधिकारी सोलापूर ते करीत आहेत. सदर कारवाई पोहेकॉ सोमनाथ वाळुंजकर, नुरुद्दीन मुजावर पोना गोपाल बुकानूरे त्यांनी केली़