सांगोला सबजेलमधील २४ कैदी पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:22 AM2021-03-28T04:22:03+5:302021-03-28T04:22:03+5:30
प्रशासनाकडून कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी सुरु केली आहे. दरम्यान सांगोला पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी शनिवारी सकाळी ११ ...
प्रशासनाकडून कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी सुरु केली आहे. दरम्यान सांगोला पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास सांगोला तहसील कार्यालयाच्या आवारातील सबजेलला भेट दिली. विविध गुन्ह्यात बंदी असलेल्या ५४ कैद्यांची कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम फुले यांच्या पथकाने कैद्यांची तपासणी केली असता २४ जण पॉझिटिव्ह आले. एका कैद्याला अंगदुखीचा त्रास होत असून उर्वरित २३ कैद्यांना गंभीर लक्षणे नसली तरी विलगीकरण कक्षात हलविण्याच्या सूचना केल्याचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम फुले यांनी सांगितले.
सांगोला सबजेलमधील २४ कैदी एकाचवेळी कोरोना पाँझिटिव्ह आढळल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी रात्री उशिरा सबजेलला भेट देऊन त्या कैद्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.